इन्स्टाग्रामवर येणार नवं फिचर; पैसे मिळवण्यास होणार मदत

मुंबई: मेटा आपल्या सोशल मीडिया अपवर पैसे कमविण्यासाठी वापरकर्त्यांना अनेक फिचर्स देत आहे. कारण इन्स्टाग्राम चायनीज अप टिकटॉकशी स्पर्धा करत आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अपवर वापरकर्ते जाहिरातीद्वारे पैसे कमवत आहेत.मेटा ने बुधवारी सांगितले की ते इन्स्टाग्राम मध्ये ट्रेड डिजिटल कलेक्टिबल्स टूलसह अनेक नवीन फिचर्स येणार आहेत. यामुळे वापरकर्त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पैसे कमविण्यास मदत होणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, वापरकर्ते लवकरच त्यांचे नॉन-फंगीबल टोकन खरेदी करून थेट इन्स्टाग्राम वरून थेट पैसे कमवू शकतील. कंपनी लवकरच नवीन फीचर्सची चाचणी सुरू करणार आहे. मेटा कंपनीच्या मते, नवीन वैशिष्ट्यांची चाचणी युनायटेड स्टेट्समधील वापरकर्त्यांच्या लहान ग्रुपमध्ये केली जाईल आणि लवकरच इतर देशांमध्ये हे फिचर्स आणले जाईल.
वापरकर्ते अधिक पैसे कमवू शकतील

मेटा ने सांगितले की, ते युनायटेड स्टेट्समधील सर्व वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम  नवीन फिचर्समध्ये प्रवेश देत आहे. जेणेकरून ते फोटो-शेअरिंग अपवर अधिक पैसे कमवू शकतील. याशिवाय कंपनी इन्स्टाग्रामवर वापरकर्त्यांना भेटवस्तूही देत ​​आहे. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून पैसे कमविण्याचा एक नवीन मार्ग मिळाला आहे.

व्यावसायिक मोड मिळवू शकता

कंपनी फेसबुक प्रोफाईलसाठी एक प्रोफेशनल मोड देखील लाँच करत आहे,  त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक फेसबुक प्रोफाइलसह सार्वजनिकरित्या त्याचा फायदा होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने