आश्चर्य!! गुन्हेगाराच्या तोंडचे शेवटचे विधान आहे नायकेची 'टॅगलाइन'

मुंबई : तुम्हाला शूजच वेड असो वा नसो; तुम्ही नायके ब्रॅंडचं नाव ऐकल नाही असं होणं अशक्य आहे. हा शूजच्या जगातला असा एक ब्रँड आहे, ज्याचे शूज आपल्याकडे असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. नाइके आपल्या शूजसाठी आणि त्यांच्या जाहिरातींसाठी सतत चर्चेत असतात. या जाहिराती वेगवेगळ्या प्रकारच्या आणि विशेषतः तरुणांना आवडतील अशाच असतात.

नायकेची निर्मिती बिल बोवरमन आणि फिल नाईट यांनी केली होती. हे दोघेही ट्रॅक अॅथलीट होते. दोघेही अशा शूजच्या शोधात होते, जे घालून ते पळू शकतात. 1976 आधी, नायकेचा लोगो तर लोकांना माहिती होता पण त्यांची टॅगलाइन बनली नव्हती.या ब्रँडसाठी काम करणाऱ्या एजन्सीच्या प्रमुखाने 1976 मध्ये एका गुन्हेगाराबद्दल वाचले ज्याने दोन लोकांची हत्या केली होती. या गुन्ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा झाली. जेव्हा त्याला त्याचे शेवटचे विधान विचारण्यात आलेले तेव्हा तो म्हणाला – लेट्स डू इट (Let’s Do it). आणि अशी नायके ची टॅगलाइन ठरली

नायकेचा लोगो ग्रीक पौराणिक कथांमधून आला आहे

हिंदू परंपरेप्रमाणेच ग्रीसमध्ये पौराणिक कथांना महत्त्व आहे. ग्रीक ग्रंथांमध्ये अनेक देव-देवता आहेत. नायके ही या देवींपैकी एक आहे. यावरून ब्रँडने नाव Nike ठेवले. हे डिझाइन 1988 मध्ये ग्राफिक डिझाइनच्या विद्यार्थ्यी कॅरोलिन डेव्हिडसनने Nike साठी तयार केले होते.नायकेचे संस्थापक फिल नाइट हे कॅरोलिनचे अकाउंट्सचे शिक्षक होते. त्यांनी कॅरोलिनला काहीतरी बनवायला सांगितले आणि त्याने नायके देवीचे पंख बनवले. आज Nike ने वापरलेले Swoosh हे चिन्ह खरंतर या देवीच्या पंखांनी प्रेरित होते. तिच्या पंखांनी तिच्या सैन्याला बळ मिळते. जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते उत्साहाने म्हणतात, "नाईके."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने