किरण माने घराबाहेर, पण खेळ सुरूच.. दिली स्पेशल पावर..

मुंबई: काल रविवारी बिग बॉसची चावडी चांगलीच रंगली. बिग बॉसने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे सदस्यांना धक्का बसला. कालच्या यशश्रीच्या एक्सिटनंतर सदस्यांचे टेन्शन वाढले होते. काल जवळपास ४९ दिवसाच्या प्रवासानंतर यशश्रीला घराबाहेर पडावे लागले. त्यांनंतर अजून एक सदस्य घराबाहेर पडणार असे जाहीर झाले. त्या स्पर्धकाला घराबाहेर काढायला मांजरेकर स्वतः घरात आले. यावेळी किरण मानेचे नाव जाहीर झाले तो घराबाहेर पडला. पण इथेच खरा गेम फिरला.कोणता सदस्य चांगला खेळला, कोण चुकलं, कोणी टास्क उत्तमरीत्या पार पाडला या सगळ्याचा हिशोब महेश सरांनी चावडीवर घेतला. तर अमृता धोंगडेला देखील सरांनी सुनावले. अपूर्वा आणि किरण माने यांच्यात शाब्दिक बाचाबाची बघायला मिळाली. किरण माने म्हणाले, ‘एक वाक्य खूप छान होतं अपूर्वाचं की अमृता बिग बॉसला खूप हलक्यात घेतेय ' ज्यावर अपूर्वाचे म्हणणे होते मी असं काहीही बोले नाही, खोटारडा माणूस आहेस तू. किरण मानेचे म्हणणे आहे प्रोजेक्शनच्या नावाखाली आक्रस्थाळेपणा करू नको. हिडीस दिसतं ते. अपूर्वा यावर म्हणाली, हिडीस काय दिसते ते मी बघून घेईन तू कसा दिसतो ते बघ..'त्यानंतर स्पर्धकांनी आपल्याला वाटणारे बॉटम पाच सदस्यही निवडले. या सगळ्यानंतर तो कठीण क्षण आला ज्यामध्ये घरामधून बाहेर पडणार होता दुसरा सदस्य. आणि त्यासाठी खुद्द महेश मांजरेकर घरामध्ये गेले. किरण माने यांना घराबाहेर पडावे लागले, असे सांगण्यात आले. पण किरण माने ही केवळ स्पर्धकांसाठी घराबाहेर पडले आहे. इथे बिग बॉसने थोडा ट्विस्ट आणला आहे, ज्याची कल्पना प्रेक्षकांनाही होती.

पण नंतर महेश सरांनी जाहीर केले किरण माने घराबाहेर पडला असला तरी तो खेळाबाहेर पडला नाहीये, हा एक खेळाचाच भाग आहे. त्यानंतर बिग बॉसने किरण माने यांना एका सीक्रेट रूम मध्ये ठेवलं, जिथून ते संपूर्ण घरावर नजर ठेवणार आहेत. त्यांच्याविषयी कोण काय बोलतं, कोण कसं वागतं ही आता त्यांच्यासमोर उगड होणार आहे. तेव्हा आता गेम पूर्णतः पलटला आहे. त्यामुळे पुढचा खेळ अजून रंजक होणार यात शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने