“तुम्ही साकारलेले प्रभू श्रीराम…” सुबोध भावेने शेअर केला रामायण फेम अरुण गोविल यांच्याबरोबरचा फोटो

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकताच त्याने अभिनेते अरुण गोविल यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.सुबोध भावेने फोटो शेअर करत त्यावर कॅप्शन लिहला आहे की विक्रम वेताळ आणि रामायण लहानपणी पाहिलेल्या आणि कायमस्वरूपी लक्षात राहिलेल्या या दोन मालिका. त्यातील प्रमुख भूमिका साकारणारे अरुण गोविल सर. त्यांचा चाहता होतोच. त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. तुम्ही सांभाळून घेतलं तुम्हाला आणि तुम्ही साकारलेल्या प्रभू श्रीराम यांना माझा नमस्कार, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांची चाहत्यांमध्ये आजही तेवढीच क्रेझ आहे. आजही देशभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. एकेकाळी अशी वेळ होती त्यांच्या या भूमिकेमुळे देशभरात कुठेही गेल्यावर लोक त्यांना नमस्कार करत असत. मध्यंतरी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान सुबोध भावे नुकताच ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दिसला होता. सुबोध नाटक, मालिका, चित्रपट आणि आता वेबसीरीज अशा माध्यमांमधून तो आपल्या भेटीस येणार आहे. सुबोधने त्याच्या कामाबद्दल फारशी माहिती दिली नाही मात्र तो आता अरुण गोविल यांच्याबरोबर काम करत असल्याने साहजिकच त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने