Joyland: कहर! 'ऑस्कर'साठी पाठवलेल्या चित्रपटावरच पाकिस्तानकडून बंदी; कारण…

पाकिस्तान: 'जॉयलँड' हा चित्रपट पाकिस्तानकडून ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री आहे. दरम्यान या चित्रपटाता ट्रेलर 4 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, पण त्यापूर्वीच पाकिस्तानने या चित्रपटावर बंदी घातली.'जॉयलँड'चे दिग्दर्शन सईम सादिक यांनी केले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलसह इतर अनेक परदेशी चित्रपट महोत्सवांमध्ये तो दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाची समीक्षकांकडून प्रशंसा करण्यात आली आहे आणि परदेशातही पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटातील अत्यंत आक्षेपार्ह गोष्टी दाखवल्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाला लोकांना दाखवण्यासाठी प्रमाणपत्र मिळाले होते. त्यानंतर आता हे पाऊल उचलण्यात आले आहे.आधी सर्टिफीकेट नंतर बंदी

17 ऑगस्ट रोजी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत प्रमाणपत्र दिले होते. दरम्यान चित्रपटाच्या आशयावरून चित्रपटाला विरोध झाला होता, त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटावर बंदी घातली. 11 नोव्हेंबर रोजी मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, "चित्रपटात अत्यंत आक्षेपार्ह मजकूर असल्याच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, जो आपल्या समाजातील मूल्ये आणि मानकांनुसार नाही."

चित्रपटाच्या कथेवरून वाद

सलीम सादिक यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची कथा पितृसत्ता आणि सनातनी दृष्टिकोन दाखवते. असे एक कुटुंब आहे ज्यामध्ये आपल्या आपत्यांना मुलगा व्हावा अशी त्यांची अपेक्षा असते. कुटुंबातील लहान मुलगा गुपचूप इरॉटिक डांन्स थिएटरमध्ये सामील होतो जिथे तो एका ट्रान्सजेंडर महिलेच्या प्रेमात पडतो. यातूनच कुटुंबात मतभेद निर्माण होतात. 'जॉयलँड'मध्ये सानिया सईद, अली जुनेजो, अलिना खान, सरवत गिलानी, रस्ती फारूख, सलमान पिरजादा आणि सोहेल समीर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची अभिनेत्री सरवत गिलानी हिने या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'हे लाजिरवाणे आहे की 6 वर्षात 200 पाकिस्तानींनी एक चित्रपट बनवला आणि टोरंटो ते कैरो आणि कान्सपर्यंत स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. आता त्याला त्याच्याच देशात रोखले जात आहे. देशाचा हा अभिमानाचा क्षण हिरावून घेऊ नका.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने