अँड ऑस्कर गोज टू...झेलेन्स्की; Viral Videoमुळं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष चर्चेत

युक्रेन : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर झेलेन्सी यांना ऑस्कर पुरस्कार देण्यात आल्याच्या बातमीनं सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. अभिनेते म्हणून झेलेन्स्कींनी यापूर्वी कारकीर्द गाजवली आहे. त्यामुळं या चर्चांना उधाणं आलं आहे. पण नक्की हा काय प्रकार आहे, पाहुयात. दोन वेळा अकादमी पुरस्कार विजेते अर्थात ऑस्कर विजेते हॉलीवूडचे अभिनेते शॉन पेन यांच्याकडून ऑस्करची बाहुली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ब्लिदिमिर झेलेन्स्की यांना देण्यात आली, खरंतर पेन यांच्या या कृतीमुळं झेलेन्स्की स्वतः आश्चर्यचकित झाले. खरंतर रशियानं केलेल्या आक्रमणामुळं उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी अभिनेते पेन यांनी युक्रेनच्या आपल्या तिसर्‍या भेटीत आपल्याला मिळालेल्या दोन ऑस्कर बाहुल्यांपैकी एक बाहुली राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेऊन त्यांना भेट दिली.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, शॉन पेन यांनी झेलेन्स्की यांना युद्ध संपेपर्यंत ही ऑस्करची बाहुली त्याच्यांकडे ठेवण्यास सांगितलं. झेलेन्स्की आणि पेन यांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शॉन पेन झेलेन्स्की यांना पुरस्कार देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे झेलेन्स्कींनी ऑस्करची ही बाहुली नाकारली नाही. युक्रेनच्या विजयावरील विश्वासाचं प्रतिक म्हणून त्यांनी हा पुरस्कार देशातच राहिलं असं यावेळी सांगितलं.शॉन पेन या व्हिडिओत म्हणतात की, "ही एक प्रतिकात्मक गोष्ट आहे, जी तुम्हाला मूर्खपणाची वाटेल. पण मला माहिती आहे की, हे तुमच्यासोबत असेल तर मला चित्रपटात हाणामारी करताना अधिक चेव येईल" दरम्यान, पेन यांच्याशी हस्तांदोलन करताना झेलेन्स्की नम्रपणे म्हणतात की, "हे खूप छान आहे! हा माझा सन्मान आहे. आम्हाला जिंकायचे आहे"

युक्रेनच्या सार्वभौमत्वाचं समर्थन केल्यानं झेलेन्स्की यांनी शॉन पेन यांना 'ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द III डिग्री' या पदवीनं सन्मानित केलं होतं. यापूर्वी, पेननं 2022 अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी झेलेन्स्की यांना अधिकृत आमंत्रण न पाठवल्यास तो त्याच्या ऑस्करच्या पुतळ्याचा केवळ वास घेईल, असं जाहीर केलं होतं, त्याचं हे विधान दुसऱ्यादिवशी वर्तमानपत्राचे मथळे बनले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने