“जग फिरून झालं असेल तर…”, राजू शेट्टींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला

दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ ही पदयात्रा सुरु आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा असा प्रवास करत ही यात्रा महाराष्ट्रात आली आहे. १४ दिवस ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात प्रवास करणार आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला आहे. जग फिरून झालं असेल, तर पंतप्रधान मोदींनी देशात यात्रा काढावी, असे शेट्टी यांनी म्हटलं आहे.राजू शेट्टी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “मी स्वत: अनेक पदयात्रा काढल्या आहेत. पदयात्रेमुळे जनतेशी थेट संपर्क येत असून, त्यांच्या समस्या जाणून घेता येतात. अनुभव वाढवणाऱ्या या पदयात्रा असतात. त्यामुळे पदयात्रा कोणीही काढू त्याचं स्वागत केलं पाहिजं,” असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं.“देशातील गोरगरीब जनता…”

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जग फिरून झालं असेल, तर एक दोन महिने पदयात्रेसाठी द्यावीत. पंतप्रधानांनी कन्याकुमापासून कश्मीरपर्यंत एक पदयात्रा काढावी. आपल्या देशातील गोरगरीब जनता कशा पद्धतीने जगत आहे, याचा अनुभव त्यांनी घ्यावा,” असेही राजू शेट्टी यांनी म्हटलं.

“…तर ‘भारत जोडो यात्रे’त”

‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार का? यावरही राजू शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “महाराष्ट्रात १७ आणि तारखेला ऊस आंदोलन होणार आहे. त्यातून वेळ मिळाला अथवा सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या, तर ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होईन. तसेच, राहुल गांधींना शुभेच्छाही देईन,” असेही शेट्टी यांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने