माणसानंतर आता पोपटही व्हॉट्सअ‍ॅपवर; चॅटमधील मेसेज व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर प्राणी आणि पक्ष्यांचे अनेक व्हिडिओ येत असतात. त्यातील काही पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. हे व्हिडिओ पाहून प्राणी पक्षी किती हूशार झाले आहेत याचा अंदाज लावता येऊ शकतो.असाच एका पोपटाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या आज आपल्यापैकी अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपवर आहेत. आता माणसं काय कमी होती आता या व्हर्च्युअल दुनियेत पोपटानेदेखील उडी घेतली आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये चक्क पोपट व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये मेसेज टाइप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ गुलजार नमक या विडंबन ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे.


व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये मोबाईलच्या स्क्रीनसमोर एका वेगळ्याच प्रकारचा पोपट बसलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे या पोपटाचा रंगही नेहमीच्या पोपटापेक्षा खूप वेगळा आहे.या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती व्हॉट्सअपमध्ये मेसेज टाईप करत आहे. त्यावेळी अचानक या पोपटाने मोबाईलचा ताबा घेत चोचीने मेसेज टाईप करू लागला. पोपटाच्या टायपिंगमुळे चॅटबॉक्स भरला. त्यानंतर पोपट हा मेसेज सेंड करण्यासाठी खाली असलेले बटण दाबण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने