‘पठाण’च्या टीझरसाठी चाहते उत्सुक; दीपिका आणि शाहरुखचे नवे फोटो व्हायरल

मुंबई : यावर्षी मार्च महिन्यात शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज बाहेर आले होते. या फोटोजमुळे चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण झाली होती. शाहरुख तब्बल ३ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षक चांगलेच उत्सुक होते. त्यानंतर काही महिन्यांनी ‘पठाण’ची घोषणा करण्यात आली आणि अधिकृतरित्या जॉन अब्राहम, दीपिका पदूकोण आणि शाहरुख खान यांच्या पात्रांची पुसटशी ओळख करून देण्यात आली.त्यानंतर सोशल मीडिया पठाण हा कायम ट्रेंडमध्ये आहे. आता पुन्हा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची काही छायाचित्रे बाहेर आली आहेत. या फोटोमध्ये दीपिका आणि शाहरुख त्यांच्या चित्रपटाच्या लूकमध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे. फिल्मफेअरच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

या चित्रपटाबाबत प्रचंड गुप्तता पाळली असली तरी आता हळूहळू काही गोष्ट बाहेर येत आहेत. हे व्हायरल झालेले फोटो पाहून आता शाहरुखच्या ‘पठाण’च्या टीझरची वाट बघत आहेत. २ नोव्हेंबर म्हणजेच शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त ‘पठाण’चा टीझर पाहायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोशल मिडियावर तर याची चांगलीच चर्चा सुरू आहे. नेटीजन्सनी तर ‘पठाण टीझर’ हा हॅशटॅगसुद्धा ट्रेंड करायला सुरुवात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने