पेट्रोललाही असते एक्सपायरी डेट?

मुंबई : दुकानातून एखादे समान खरेदी करताना स्पेशली फूड प्रोडक्ट घेताना आपण त्याची एक्सपायरी डेट  बघतो. औषध घेताना तर ती तारीख पाहूनच औषधे घेतली जातात.पण तुम्ही कधी विचार केलाय का ? की, आपली गाडी ज्या इंधनावर चालते. ते इंधन म्हणजे पेट्रोल कधी एक्सपायर होते?, त्याला अंतिम तारीख असते का? चला आज याबद्दल जाणून घेऊयात.सध्या महागाई वाढली याची जाणीव प्रत्येकाला पेट्रोल पंपावर गेल्यावर होतेच. पेट्रोलचे वाढते दर डोखेदुखी झाले आहेत. लॉकडाऊन काळात तर लोकांनी अधिक पैसे देऊन पेट्रोल विकत घेतले. काही लोक तर गाडीत पेट्रोल भरून ठेवतात. कधीतरी उपयोग होईल म्हणून, पण असे करणे चुकीचे आहे.लोकांची समजूत आहे की, पेट्रोल कधी खराब होत नाही. पण तसे नाही. पेट्रोलही एका ठराविक वेळेनंतर खराब होते. याचे कारण असे की, पेट्रोल आणि डिझेल रिफाइन करताना त्यामध्ये अनेक रसायने मिसळली जातात. यापैकी एक म्हणजे इथेनॉल होय. ही रसायने पेट्रोल आणि डिझेलची आयुष्य कमी करतात.भारतातही यावेळी दिल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल विकले जात आहे. तुम्ही वाहन दीर्घकाळ उभे ठेवल्यास त्यातील पेट्रोलच्या रसायनांचे तापमानासोबत वाफेत रूपांतर होते. त्यांना बाहेर येण्याची संधी मिळत नाही, तेव्हा पेट्रोल आणि डिझेल सडू लागते.

किती दिवसात पेट्रोल खराब होते

पार्क केलेल्या कारमध्ये भरलेले पेट्रोल किती दिवस खराब होईल ते तापमानावर अवलंबून असते. कारच्या आजूबाजूचे तापमान जितके जास्त असेल तितक्या लवकर डिझेल-पेट्रोल खराब होऊ शकते. तुमची कारमध्ये पेट्रोल भरून ती वापरलीच नसेल. कडक उन्हात ती 1 महिना सतत पार्क केली असेल तर त्यातील तेल खराब होते.एका अहवालानुसार, सीलबंद कंटेनरमध्ये पेट्रोल वर्षभर साठवता येते. तर कारच्या टाकीमध्ये ते 20 डिग्री सेल्सिअस तापमानात 6 महिने पेट्रोल स्टोअर करता येते. तापमान जर 30 डिग्री सेल्सिअस असेल तर तीन महिन्यांपर्यंत पेट्रोल चांगले राहते.त्यामुळे पेट्रोल साठवून ठेवण्यासाठी काही अन्य पर्यायांचा विचार करावा. किंवा गाडीतच स्टोअक करायचे असल्यास गाडी कोणत्या तापमानात आहे हे आधी तपासावे. तसेच, गाडी सतत फिरती ठेवावी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने