कांदा, मुळा अन् भाजी, जर्मन सूनबाई माझी!

मुंबई : तुम्ही अनेकदा विदेशी मुलांमुलींचा देसी लुक बघितला असेल. खरं तर भारतातील मुलं परदेशात शिकायला जातात आणि तेथून विदेशी सुन घेऊन येतात, असे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सोशल मीडियावरही याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये जर्मनीवरुन भारतात आलेली सून एका गावात कांद्याची लागवड करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये तुम्हाला दिसेल की एक विदेशी सुन देसी अंदाजमध्ये शेती करत आहे. या विदेशी महिलेने भारतीय संस्कृतीनुसार भांगेत कुंकू भरलंय आणि ती शेतात बसून कांद्याची लागवड करत आहे. तिला असं काम करताना बघून व्हिडीओ बनविणारा व्यक्ती तिला काही प्रश्न विचारतो आणि ती त्याची दिलखूलासपणे उत्तरे देते.व्हिडियो बनविणारा व्यक्ती तिला विचारतो की मी तुला विचारू शकतो का ? त्यावर ती हिन्दी मध्ये उत्तर देते ‘हां जरूर’. त्यानंतर तो व्यक्ती विचारतो तुम्ही कुठून आला आहात? त्यावर ती म्हणते ‘मैं जर्मनी से हूं’ और यहां खेत में प्याज लगा रही हूं." त्यावर तो पुढे विचारतो की तुम्ही जर्मनीवरुन भारतात कांद्याची लागवड करायला आला आहात? त्यावर ती महिला हसते.

कांद्याची लागवड करताना मजा येत असल्याचे ती महिला म्हणते. या दरम्यान दूर उभी असलेली जर्मन सुनबाईची सासू हसताना दिसत आहे.सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. सोबतच हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला असून या व्हिडीओला भरपूर लाईक्स आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने