‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये मुलाबरोबरच महेश मांजरेकरांनी लेकीलाही दिली काम करण्याची संधी, लूक समोर

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटानंतर आता आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक महेश मांजेरकर यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची नुकतीच घोषणा केली. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर चित्रपटातील इतर कलाकारांचा लूकही समोर आला. महेश मांजरेकर यांची लेकही या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.गौरीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या चित्रपटामधील लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती फारच गोड दिसत आहे. तसेच तिच्या चाहत्यांनीही तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे. गौरीने फोटो शेअर करत म्हटलं की, “‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाचा मी भाग आहे याचा मला अभिमान आहे.”गौरीने याआधी ‘दे धक्का २’, ‘पांघरुण’ चित्रपटामध्ये काम केलं आहे. हे दोन्ही चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केले होते. ती उत्तम डान्सरही आहे. आता या ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल गौरीही फार खूश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने