कहर झाला! खेळासाठी एकमेकांची डोकी भादरली...

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे आजच्या भागात कळेलच. पण आज घरामध्ये सदस्यांना गमवाव्या लागणार आहेत त्यांच्या काही मौल्यवान वस्तू... कारण घरात रंगणार आहे “सोसल तितकंच सोशल” - साप्ताहिक कार्य ! या टास्कमध्ये सदस्यांची कसोटी लागते कारण पणाला लागतात त्यांच्या काही महत्वाच्या गोष्टी. आता टीम्स सदस्यांना कोणत्या गोष्टींचे बलिदान द्यायला सांगणार हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण सदस्य ते करण्यास तयार होतील का? हा देखील मोठा प्रश्न आहे. CHALLENGE सदस्य कसे पूर्ण करतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहेनुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तेजस्विनी आणि अपूर्वा कोणतातरी पदार्थ खाताना दिसतं आहे आणि तो काही तितकासा स्वादिष्ट नसणार हे आपल्याला त्यांच्या एक्सप्रेशनवरनं प्रोमोतून कळेलंच. तर अक्षय रोहितला सांगताना दिसणार आहे रुचिराचा फोटो फाड आणि बॉटल आहे ती नष्ट कर. तर दुसरीकडे स्नेहलता सदस्यांचे कपडे फाडताना आणि हेअर ड्रायर नष्ट करताना दिसत आहे.

विकास आणि प्रसादला अक्षयने खूप मोठं CHALLENGE दिले - त्याचे म्हणणे आहे डोक्यावर ट्रीमर फिरवून दाखवा... विकास - प्रसाद ते करताना दिसत आहेत... प्रसाद हे करताना नाखूष असला तरी त्याने हे CHALLENGE स्वीकारले आहे... बघूया टास्कमध्ये पुढे काय काय होणार ? सदस्यांच्या कोणकोणत्या गोष्टी पणाला लागणार आजच्या भागामध्ये.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने