राज्यात राजकीय अस्थिरता वाढणार; संजय राऊत सुटताच ज्योतिषाचार्यांचं भाकित

मुंबईः शिंदे गटातल्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं, राज्यातले प्रकल्प बाहेर गेल्याने शिंदे - फडणवीस सरकारवर होणारी टीका अशा अनेक कारणांमुळे राज्यात सध्या सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. राजकीय गदारोळ माजलेला असतानात आता राज्यात सत्तापालटाचं भाकित ज्योतिषाचार्यांनी वर्तवलं आहे.राज्यात राजकीय अस्थिरता येण्याची शक्यता ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केली आहे. तसंच आता राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हा सगळा सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा परिणाम असल्याचंही धारणे यांचं म्हणणं आहे. २९ वर्षांपूर्वी अशाच संयोगामुळे केंद्र सरकार अस्थिर झालं होतं, असंही या ज्योतिषाचार्यांनी म्हटलं आहे.राज्यात राजकीय अस्थिरता येण्याची शक्यता ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केली आहे. तसंच आता राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. हा सगळा सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा परिणाम असल्याचंही धारणे यांचं म्हणणं आहे. २९ वर्षांपूर्वी अशाच संयोगामुळे केंद्र सरकार अस्थिर झालं होतं, असंही या ज्योतिषाचार्यांनी म्हटलं आहे.

१५ दिवसांच्या अंतराने सूर्य आणि चंद्र ग्रहण आलं आहे. त्याच्या परिणामामुळे राज्यात राजकीय अस्थिरता येईल, असं भाकित धारणे यांनी केलं आहे. त्यामुळे आता राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्याने मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत देण्यात येत आहेत. पुढच्या ४० ते ५० दिवसांच्या काळात राज्यातली राजकीय अस्थिरता आणखी वाढेल, असं भाकित धारणे या वर्तवलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने