खडसेंचे कारनामे लवकरच बाहेर येणार - गिरीश महाजन

जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांचे कारनामे लवकरच बाहेर येतील, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले.जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की एकनाथ खडसे यांनी अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी आपल्यावर खोटा गुन्हाही दाखल केला आहे, असे अनेक कारनामे लवकरच बाहेर येतील. त्यांनी कायद्याचा एवढा खोटा आधार घेतला आहे. आता आमची वेळ आली आहे. त्यांनी कायद्याला सामोरे जावे. जिल्हा दूध संघाचीही चौकशी सुरू आहे. त्यांनी पाच वर्षांत तेथे काय केले, काय नाय केले, हेही लवकरच जनतेसमोर येईल. 
आम्ही त्यांच्यासारखा एकही खोटा गुन्हा दाखल करणार नाही.जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीबाबतही श्री. महाजन यांनी श्री. खडसे यांना आव्हन दिले. श्री. खडसे आमच्या उमेदवारांवर आक्षेप घेत आहेत. ते म्हणतील तो उमेदवार आपण त्यांच्याविरोधात देऊ. त्यांनी निवडून येऊन दाखवावे, असे खुले अवाहनही श्री. महाजन यांनी खडसे यांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने