Layoff चं वारं गुगललाही लागणार? १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची तयारी सुरू

दिल्ली : जगभरात मंदीचं सावट घोंघावण्यास सुरूवात झाली आहे. Meta, Twitter, Lyft, Fintech कडून कर्मचार्‍यांची कपात करण्यात आली आहे. दरम्यान, गुगलची मूळ कंपनी, अल्फाबेट सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे.खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आतापर्यंत गुगलने कपातीची कारवाई कधी केली नव्हती. परंतु अल्फाबेटच्या माध्यमातून ती अशा इतर कंपन्यांपैकी एक बनली आहे. काढून टाकण्यात येणारे 10,000 कर्मचारी हे अल्फाबेटच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 6 टक्के असतील.मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने कर्मचाऱ्यांसाठी नवीन रँकिंग आणि परफॉर्मन्स प्लॅन बनवला आहे. ही नवीन प्रणाली गुगलच्या व्यवस्थापकांना नवीन वर्षापासून हजारो कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यास मदत करेल. या योजनेअंतर्गत, गुगलचे व्यवस्थापक कर्मचाऱ्यांचे ग्रेडिंग करून बोनस आणि इतर अनुदाने थांबवू शकतील.
TCI फंड मॅनेजमेंटने गुगलचीची मूळ कंपनी अल्फाबेटला खर्चात कपात करण्यासाठी त्यांचे कर्मचारी कमी करण्यास सांगितले आहे. 2017 पासून अल्फाबेटमध्ये सहा अब्ज शेअर्स असलेल्या गुंतवणूकदाराने कंपनीला सांगितले की कंपनीमध्ये खूप कर्मचारी आहेत आणि प्रति कर्मचारी खर्च खूप जास्त आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्फाबेटच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १.८७ लाख आहे. यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी, अल्फाबेटने आपल्या कर्मचार्‍यांना पगार भत्त्याच्या रूपात सरासरी सुमारे 2,95,884 डॉलर दिले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने