“मला शिष्य म्हणून…” गौतमीमुळे सुपाऱ्या बंद झाल्या म्हणणाऱ्याला मेघा घाडगेचे सडेतोड उत्तर

मुंबई - सध्या सर्वत्र गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना, लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्यावरुन ती चर्चेत आली आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. बिग बॉस फेम लावणी कलाकार अभिनेत्री मेघा घाडगे यांनी फेसबुक पोस्टद्वारे गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली होती. मेघाच्या या पोस्टवर अनेकांनी तिला समर्थन दिले आहे. काळजी नका करू आम्ही कायम फक्त खऱ्या कलाकारांच्या सोबत आहोत, अशा कमेंट तिच्या या पोस्टवर पाहायला मिळत होत्या.मेघा घाडगेने मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन, अशा उपहासात्मक शब्दात गौतमी पाटीलवर टीका केली होती. मेघा घाडगेच्या फेसबुक पोस्टवर पार्थ पाटील नावाच्या एका व्यक्तीने कमेंट केली आहे. ती व्यक्ती गौतमी पाटीलशी संबंधित असल्याचा आरोप मेघा घाडगेने तिच्या फेसबुक लाईव्हमध्ये केला आहे. पार्थ पाटीलच्या कमेंटवर मेघानेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

पार्थ पाटीलची कमेंट

“गौतमी पाटील हि गौतमी पाटील आहे समाज्याने तिला स्वीकारलं आहे. तिच्यामुळे तुमच्या सुपाऱ्या बंद झाल्या हे तुझं दुखणं आहे… बाकी नाही ! बिग बॉसमध्ये चेक मिळवण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ कलावंत घाडगे ताई ! इथे लिहून रोड वर येऊन गौतमीला मिळणाऱ्या सुपाऱ्या बंद नाही होऊ शकत … सत्य आणि वास्तव आहे”, अशी कमेंट पार्थ पाटील नावाच्या व्यक्तीने केली आहे. त्यावर मेघा घाडगेनेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.दरम्यान मेघा घाडगेच्या त्या प्रत्युत्तरावर अनेकांनी तिला समर्थन केले आहे. तसेच यावरुन पार्थ पाटील ट्रोल होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. “मॅडम गौतमी वरून तुम्हाला ट्रोल करणारे त्यांच्या घरातल्या मुलींना असं अश्लिल हावभाव करून नाचायला लावतील का ? तशा सुपाऱ्या त्यांना मिळवून देतील का ? असे विचारा त्यांना”, असा प्रश्न एका नेटकऱ्याने उपस्थित केला आहे.“इथं विषय सुपारीचा नाही इज्जतीचा आहे.. म्हणून मेघा ताई बोलली”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर अनेकांनी तो राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया उपाध्यक्ष असल्याचे म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने