‘बिग बॉस’च्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, प्रसाद जवादेने अमृता देशमुखला केलं प्रपोज

मुंबई : बिग बॉस’ मराठीचं चौथं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. पहिल्या दिवसापासून स्पर्धकांमध्ये भांडण, तंटे, राडा होताना दिसत आहेत. घरातील काही स्पर्धकांमध्ये मैत्री आहे तर काहींमध्ये भांडण. असा हा बिग बॉसचा खेळ चांगलाच रंगात आला असताना आता या घरात प्रेमाचे वारेही वाहू लागले आहेत.

आजवर बिग बॉस मराठीच्या प्रत्येक पर्वात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रेमाचे बंध विणले गेले आहेत. वीणा- शिवचे नाते असो, राजेश-रेशम किंवा रूपाली-पराग, बिग बॉसच्या घरात एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या अशा अनेक जोड्या प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. आता या चौथ्या पर्वातही दोन स्पर्धकांमध्ये प्रेम बहरायला सुरुवात झाली आहे. प्रसाद जवादेने अमृता देशमुखाला प्रपोज केलं आहे.बिग बॉस मराठी’ चे चौथे पर्व सुरू होऊन आता महिना उलटला असून घरातील वातावरण चांगलेच तापले आहे. कुरघोडी, ग्रुप करणे, एकमेकांना घराबाहेर काढणे यासाठी चांगलीच चुरस वाढली आहे. अशात प्रसादने अमृताला प्रपोज केल्याने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे.‘बिग बॉस’च्या कालच्या भागात ‘बिग बॉस’च्या कॉलेजमध्ये सीनियर-ज्युनियर हा टास्क सुरू होता. यावेळी सीनियरने ज्युनियर कडून कामं करून घ्यायची, त्यांना वेगवेगळे टास्क द्यायचे असे सांगितले होते. यावेळी प्रसाद ज्युनियर तर अमृता देशमुख आणि अपूर्वा नेमळेकर सीनियर गटात होत्या. तेव्हा अचानक अपूर्वा प्रसादला म्हणाली, या क्षणाला अमृता देशमुखला प्रपोज कर आणि प्रसादने चक्क गुडघे टेकून तिला प्रपोज केलं.यावेळी प्रसाद अमृताला म्हणाला, “आपल्याला तुमच्या नावाने चिडवतात. आपल्याला या तुमच्या टॉकरवडीचा छोटासा घास घ्यायचा आहे. तुझी खरी वाली फ्रेंडशिप देशील का?” प्रसाद हे सगळं बोलत असताना अमृता खूप लाजतान दिसत आहे. प्रसादने अमृताला केलेलं प्रपोज पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यामुळे टास्कच्या निमित्ताने केलेलं हे प्रपोजचं पुढे खऱ्या प्रेमात रूपांतर होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने