शिंदे गटात जाऊनही पुन्हा सरनाईक ईडीच्या रडारवर?

मुंबई : शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने ते अडचणीत आले होते. शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. यावेळी ईडी कारवाई टाळण्यासाठी आपण पाठिंबा देत आहोत, असे संकेतही सरनाईकांनी दिले होते. मात्र आता पुन्हा त्यांच्यावर ईडीचं सावट आहे.

शिंदे गटात जाऊनही पुन्हा प्रताप सरनाईक ईडीच्या रडावर आले आहेत. सरनाईकांची ११ कोटींची संपत्ती ईडीकडून ताब्यात घेतली जाणार असल्याचं वृत्त सामच्या सूत्रांनी दिलं आहे. सरनाईकांचे ठाण्यात दोन फ्लॅट आहेत, तर मीरारोडवर एक प्लॉट आहे. ही मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात येणार आहे.

एनएसईएल घोटाळ्याच्या संदर्भात आता ईडी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने प्रताप सरनाईकांच्या संपत्तीचा ताबा घेण्यात येणार आहे. दरम्यान, हीच कारवाई टाळण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी बंडावेळी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. मात्र तरीही त्यांना दिलासा मिळालेला नाही, हे यावरुन स्पष्ट होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने