चाहत्यांनी दिलेली अनमोल भेटवस्तू पाहून मुक्ता बर्वे भावूक; फोटो शेअर करत म्हणाली, “प्रत्येक फॅन तुम्हाला…”

मुंबई : सध्या सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील अंतर फारच कमी झालं आहे. आपला आवडता स्टार सेलिब्रिटी काय करतो, कुठे आहे, कुणाबरोबर आहे याविषयी माहिती चाहत्यांना अगदी सहज मिळते. सध्याच्या कित्येक सेलिब्रिटी लोकांनाही ही गोष्ट फार आवडते. याचा गैरफायदा घेणारे काही चाहते असतात तसेच या गोष्टीतून एका कलाकाराला घडवणारेही काही चाहते असतात. अशाच आपल्या चाहत्यांबद्दल एक पोस्ट शेअर करताना मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे भाऊक झाली आहे.तिच्या ३ चाहत्यांनी नुकतंच मुक्ताला तिचंच एक सुंदर पोर्ट्रेट भेट म्हणून दिलं आहे. हे पोर्ट्रेट पाहून मुक्ता फारच भावूक झाली. खरंतर या तिघांना ती बरेच वर्षं ओळखत असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. पण त्यांनी दिलेली ही भेटवस्तू पाहून मुक्ता चांगलीच भारावून गेली आहे. भोपाळच्या एका दिग्गज कलाकाराकडून हे पोर्ट्रेट काढल्याचंही मुक्ताने शेअर केलं आहे. आपल्या या चाहत्यांबरोबर आणि त्या सुंदर पोर्ट्रेटबरोबर एक फोटो शेअर करत मुक्ताने तिच्या भावना तिच्या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.

मुक्ताच्या पोस्टवर या पोर्ट्रेटचं आणि तिच्या या हितचिंतकांचं लोकांनी कौतुकही केलं आहे. मुक्ता ही नुकतीच ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत आपल्याला दिसली, शिवाय ‘आपडी थापडी’ या चित्रपटाच्या माध्यमातूनही ती आपल्यासमोर आली. शिवाय तिचं ‘चारचौघी’ हे नाटकही रंगमंचावर चांगलंच गाजतंय. मुक्ताच्या अभिनयाची सगळेच प्रेक्षक प्रशंसा करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने