मिरचीची धुरी, तेल, कचरा.. जिंकण्यासाठी स्पर्धकांनी सोडली पातळी

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्क दरम्यान टास्कवरून होणारी भांडणं, मारामारी, शाब्दिक चकमक, आरोप - प्रत्यारोप हे होताना आपण बघत आलोच आहे. टास्कसाठीच्या सदस्य वाटेल ते करतात पण आता चक्क मिरची धुरी,गरम तेल, पाणी याचा वापर सदस्यांनी केला आहे.आज बिग बॉस यांनी "खुल्ला करायचा राडा" हे कार्य सदस्यांवर सोपवले आहे. या कार्यात स्पर्धकांनी अतिशय चुकीच्या युक्ता वापरल्या आहेत या कार्यमध्ये स्पर्धकांनी सीमा ओलांडली आहेबिग बॉसने सोपावलेल्या "खुल्ला करायचा राडा" या कार्यामध्ये घरातील दोन स्पर्धकांना सी-सॉवर बसायचे आहे. इतर स्पर्धकांनी त्यांना त्यावरुन उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. काहींनी गरम तेल स्पर्धकाला मिरचीची धुरी देण्याचा प्रयत्न केला आहे तर कचरादेखील अंगावर टाकला आहे.

यावेळी स्नेहलता वसईकर हिच्यावर फुल ॲटक होताना दिसत आहे. कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉसच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोवरुन स्पर्धकांना दिलेल्या टास्कमध्ये राडा होणार असल्याचे समोर आले आहे. तेसच स्पर्धक किती चुकीचा मार्ग अवलंबत आहेत हे देखील प्रोमोमध्ये दिसत आहे. आता कोण जिकणार आणि कुणावर ही कार्य शेकणार ही आज कळेलच.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने