अक्षय कुमार साकारणार जसवंत सिंग गिल.. कोण आहे हा रीयल लाईफ हीरो?

मुंबई:  आपण काहीतरी वेगळं आणि नवीन घेऊन येत आहोत अशी घोषणा अभिनेता अक्षय कुमारने दोन दिवसांपूर्वी केली होती. ते नेमकं काय असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर त्याचा खुलासा झाला असून अक्षय कुमारने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. केवळ इंजिनियर नव्हे तर एक योद्धा, रियल लाईफ हीरो अशी ख्याती असणारे जसवंत सिंग गिल यांच्या आयुष्यावर तो बायोपिक करत आहे.1989 मध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या ६४ खाण कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर काढणारे इंजिनियर जसवंत सिंग गिल यांची चरित्रकथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना रियल लाईफ हीरो असे संबोधले जाते. याच खऱ्या हिरोच्या आयुष्यावर आता चित्रपट येत आहे आणि अभिनेता अक्षय कुमार आपल्याला जसवंत सिंग गिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई करणार आहेत. ज्यांनी यापूर्वी अक्षय कुमारसोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘रुस्तम’ या चित्रपटात काम केले होते. पूजा एंटरटेनमेंटने यापूर्वी आम्हाला कुली नं.1, बीवी नं.1, RHTDM, बडे मियाँ छोटे मियाँ, फालतू, जवानी जानेमन, आणि बरेच काही सारखे अप्रतिम चित्रपट केले आहेत. सरदार जसवंत सिंग गिल यांच्या पराक्रमावर आधारित हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने