कमी पगार ठरतोय घटस्फोटाला कारण, पाच वर्षात तब्बल दहा हजार घटस्फोट

नाशिक:  लग्न हा भारतीय समाज व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक मानला जातो. लग्मामुळे दोन व्यक्तीचं आयुष्य बदलतं. नवीन आयुष्य सुरू होतं पण हल्ली घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मागे अनेक कारणे समोर आली आहे सध्या घटस्फोटवरुन नाशिक खूप चर्चेत आलंय कारण नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षाच दहा हजार घटस्फोट झाल्याचे उघडकीस आले. खरं तर आकडा खूप धक्कादायक आहे.शिक शहरामध्ये दिवसेंदिवस घटस्फोटांची संख्या वाढताना दिसतेय. शहरात चक्क 10 हजार 14 जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची बाब समोर आली आहे. याहून धक्कादायक म्हणजे दररोज 10 अर्ज दाखल होत असल्याचेही माहिती समोर आली.

नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयाच्य मते 2018 ते 2022 या पाच वर्षांमध्ये 10 हजार 14 जोडप्यांचे घटस्फोट झाले. 2018 मध्ये 1540 घटस्फोट, 2019 मध्ये 1715, 2020 मध्ये 2080, 2021 मध्ये 2327 तर 2022 मध्ये 2353 घटस्फोट झाल्याचे समोर आले आहेत.घटस्फोटामागे ही कारणे असू शकतात-

  • कोरोना काळात अनेकांचे वेतनामध्ये कपात झाली. अनेकांची नोकरी गेली. त्यामुळे या काळात अनेक दाम्पत्यांमध्ये वाद देखील वाढले.

  • कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अनेक दाम्पत्य वर्क फ्रॉम होम किंवा घरी एकत्र होते. त्यामुळेही घटस्फोटाचे प्रकरणे समोर आली आहेत.

  • मोबाईल आणि सोशल मीडिया हे सुद्धा घटस्फोटामागे कारण आहे. सतत मोबाईल वापरणे, मोबाईलवर बोलणे यामुळेही वाद झाल्याचे दिसून येते.

  • जोडप्यांच्या वादात घरच्यांचा हस्तक्षेपामुळे सुद्धा घटस्फोटाचे प्रमाण वाढले. विशेषत: आईवडिलांचा हस्तक्षेपामुळे नवरा बायकोचे नाते तुटल्याचे समोर आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने