दोन वर्षांचं सीक्रेट डेटिंग! व्हिडीओमधून केलं लग्न जगजाहीर

अमेरिका : मिस अर्जेंटिना आणि मिस प्यूर्टो रिको या दोघीही दोन वर्षांच्या डेटिंगनंतर अखेर लग्नबंधनात अडकल्या. या दोघींची २ वर्षाआधी २०२० मध्ये मिस ग्रँड इंटरनॅशल पेजेंटमध्ये भेट झाली होती. यानंतर दोघींचीही जवळीक वाढली. अलकडेच त्यांनी एका सीक्रेट सेरेमनीध्ये लग्न केलंय. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाय व्हायरल होतोय.या दोघींनी त्यांच्या नात्याला लग्नाचं नाव दिलंय. मिस अर्जेंटिना आणि मिस प्यूर्टोने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यांनी एका सीक्रेट सेरेमनीत २२ ऑक्टोबरला लग्न केलं असल्याचीही माहिती दिलीय. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहीलंय की, 'आमच्या नात्याचं गुपित आम्ही अखेर २८ ऑक्टोबरला जगासमोर उघड केलंय. आमच्या नात्याला आम्ही जगासमोर जाहिर करतोय.'

दोघींचा व्हिडीओ इंस्ट्राग्रामवर पोस्ट होताच प्रचंड व्हायरल झाला. आतापर्यंत त्यांच्या या व्हिडीओला लाखो लोकांचे लाइक्स आणि शेअर्स आहेत. या व्हिडीओनंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसलाय. यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटताना दिसताय.या सुंदऱ्यांनी त्यांच्या नात्याला जगासमोर आणत पोस्ट केलेल्या व्हिडीओनंतर मिस ग्रँड इंटरनॅशलनेही अधिकृत अकाउंटवर दोघींचा फोटो पोस्ट करत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने