अदनान सामीनं का सोडलं पाकिस्तान?; म्हणाला,'सत्य ऐकाल तर धक्का बसेल...'

मुंबई: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी अनेकदा ट्वीटरवर भारत आणि पाकिस्तानी नेटकऱ्यांच्या वादात फसताना दिसतो. नुकत्याच झालेल्या टी २० वर्ल्डकप मध्ये इग्लंडच्या विजयानंतर सोशल मीडियावर अदनाननं इंग्लंडच्या संघाचे अभिनंदन करताना ट्वीटमध्ये लिहिलं आहे की सर्वोत्कृष्ट टीमचा विजय. यानंतर मात्र पाकिस्तानी संघाच्या चाहत्यांनी अदनानला पुन्हा एकदा टार्गेट करायला सुरुवात केली आहे.आता हे प्रकरण थोडं पुढे पोहोचलं आहं आणि अदनानं ट्वीट करत पाकिस्तानी ऑथोरिटीवर आपला राग जाहिररित्या व्यक्त केला आहे. ट्वीटरवर एक लांबलचक पोस्ट लिहिताना त्यात म्हटलं आहे की, तो लवकरच पाकिस्तानविषयी काही मोठे खुलासे करणार आहे. त्याला पाकिस्तानकडून कशी अनेक वर्ष वाईट वागणूक मिळाली,आणि पाकिस्तान सोडण्याचं तेच कसं मोठं कारण होतं याविषयी तो सांगणार आहे. अर्थात त्यानं हे देखील नमदू केलं की त्याची पाकिस्तानच्या सर्वसामान्य लोकांविषयी काहीच तक्रार नाही,तो त्या प्रत्येक व्यक्तीचा सम्मान करतो ज्याचं त्याच्यावर कलाकार म्हणून प्रेम आहे.टी २० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराजय झाल्यानंतर रविवारी अदनानने ट्वीट करत लिहिलं आहे,''उत्कृष्ट संघ जिंकला. अभिनंदन इंग्लंड..हा फक्त खेळ आहे. दुसऱ्या लोकांच्या अपयशावर तिरकस बोलत आपली छाती बडवणाऱ्यांना ही चांगलीच शिकवण आहे''. आपल्या ट्वीटसोबत अदनानने पाकिस्तानी चाहत्यांची खिल्ली उडवताना दिवंगत बप्पी लहिरी यांच्या मेरे तो लग गए.. गाण्याची छोटीशी क्लीप शेअर केली.

या ट्वीटनंतर पाकिस्तानी चाहत्यांनी अदनाला टार्गेट करण्यास सुरुवात केली आणि म्हणाले,'त्याचा देशाप्रती आपण एकनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे'. यापैकीच एका ट्वीटला उत्तर देत अदनानने लिहिलं आहे की,''माझी एकनिष्ठता फक्त केवळ एका देशाप्रती आहे आणि तो आहे भारत. दुसरीकडे तुम्ही लोक मात्र मला कन्फ्यूज वाटत आहात- कधी तुमची ईमानदारी तुमच्या झेंड्याप्रती असते तर कधी आर्मीप्रती?, (आर्मीनं तर तुम्हाला उद्ध्वस्त केलं आहे),कधी युएसए साठी,कधी चीन साठी तर कधी सौदीसाठी? तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या मनातही यावरनं गोंधळ उडालेला असणार''.अदनानच्या या ट्वीटनंतर ट्वीटरवर वाद चिघळला आणि पाकिस्तानच्या समर्थकांनी अदनानला टार्गेट करायला सुरुवात केली. यानंतर अदनाननं देखील लांबलचक पोस्ट शेअर करत तिखट शब्दात पाकिस्तानी चाहत्यांवर वार केले.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने