संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर रोहित पवारांनी शेअर केलेला Video चर्चेत; एका शब्दाच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

मुंबई:   शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणामध्ये जवळजवळ १०० दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. पीएमएलए न्यायालयाने दिलासा देत संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊतांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, दुसरीकडे ईडीने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळताच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही ट्वीटरवरुन राऊत यांना जामीन मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना एक सूचक ट्वीट केलं आहे.रोहित पवार यांनी ट्वीटरवरुन पिंजऱ्यातून बाहेर झेप घेणाऱ्या वाघाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी ‘सत्यमेव जयते’ अशी कॅप्शन दिली असून संजय राऊत यांचं ट्वीटर हॅण्डलही टॅग केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने