नऊ वर्षा नंतर रुपयाला 'अच्छे दिन'; वाचा काय आहे कारण

नवी दिल्ली : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी रुपया 80.6888 वर उघडला, तर मागील सत्रात तो 81.8112 अंकांवर बंद झाला होता. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांच्या तेजीसह उघडला आहे.भारतीय रुपयाने आज मोठी झेप घेतली आहे. असे मानले जात आहे की, अमेरिकेत अपेक्षेपेक्षा कमी महागाईच्या आकडेवारीमुळे डॉलर घसरला आहे आणि त्यामुळे रुपया मजबूत झाला आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात भारतीय रुपया 80.75 रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करत होता.
2013 नंतर रुपयाची सर्वात मजबूत सुरुवात

आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी रुपया 80.6888 च्या पातळीवर उघडला, तर मागील सत्रात तो 81.8112 अंकांवर बंद झाला होता. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांच्या मजबूतीसह उघडला. रुपयात गेल्या नऊ वर्षांतील ही सर्वात मोठी ओपनिंग आहे. सप्टेंबर 2013 पासून रुपया शुक्रवारी (11 नोव्हेंबर) सर्वात मोठ्या वाढीसह उघडला आहे आणि सात आठवड्यांच्या उच्चांकावर व्यवहार करत आहे.सुरुवातीच्या सत्रात रुपयाने 80.6788 ते 80.7525 रुपयांपर्यंत व्यापार केला आणि तो सातत्याने 81 रुपये प्रति डॉलरच्या खाली राहिला. बाजारातील जाणकारांच्या मते, अमेरिकन डॉलरने 81.91 पर्यंत वाढल्यानंतर रुपया वधारण्याचा मार्ग मोकळा केला आहे. शुक्रवारी दिवसभर रुपया 80.25 ते 81 च्या दरम्यान व्यवहार करत राहील अशी अपेक्षा आहे.

अमेरिकेतील महागाई कमी झाल्याचा परिणाम

अमेरिकेत ऑक्टोबर महिन्यातील चलनवाढीचे आकडे बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी आहेत, त्यामुळे जागतिक शेअर बाजारात चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. डॉलर निर्देशांकावर मोठा दबाव असून तो 108 च्या खाली आला आहे. याचाच परिणाम म्हणजे आज रुपया डॉलरच्या तुलनेत 110 पैशांच्या उसळीसह उघडला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने