'त्याला पाहिलं की सईच्या डोळ्यात दिसते चमक?', क्रांती रेडकरनं उघडं केलं सईचं पितळ

मुंबई : सई ताम्हणकर सध्या तिच्या एका पोस्टमुळे भलतीच चर्चेत आहे. त्या फोटोत ती कोणाशी तरी बोलते आहे,ती व्यक्ती पाठमोरी उभी आहे. अंदाज लावला जातोय हा एक अभिनेता आहे,ज्याच्याशी बोलताना सईच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. खरी गम्मत पोस्टपेक्षा या पोस्टवर केलेल्या कमेंटमध्ये आहे.सईनं त्या अभिनेत्यासोबतचा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं आहे की, ''रिअलवाला कॅन्डीड,ओळखा पाहू कोण?'' आता सईच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच अनेक मराठी कलाकारांनी देखील कमेंट केली आहे. त्यात क्रांतीनं चक्क लिहिलं आहे,'मी लगेच ओळखलं तू कोणाशी बोलतेयस,आपण याविषयी खूप आधी बोललो होतो, तुझ्या डोळ्यातील चमकच सांगतेय तु त्याच्याशीच बोलतेयस'.


आता या फोटोवर इतरही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत पण क्रांंतीची ही कमेंट सर्वात अधिक लक्षवेधी ठरत आहे. आता माहितीसाठी सांगतो की सई त्या फोटोत प्रतिक बब्बरशी बोलत आहे. जो स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा असण्यासोबतच बॉलीवूडचा उत्तम अभिनेता आहे. आणि क्रांतीच्या कमेंटवरनं एव्हाना लक्षात आलंच असेल की सईला प्रतिक प्रचंड आवडत असणार.

फोटो संदर्भात थोडक्यात माहिती द्यायची तर हा फोटो सईच्या आगामी 'इंडिया लॉकडाऊन' सिनेमाच्या प्रमोशनल कार्यक्रमा दरम्यान क्लीक केला गेला आहे. मधूर भांडारकर दिग्दर्शित या सिनेमात सई ताम्हणकर प्रतिक बब्बर सोबत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सिनेमाचं एक पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. सिनेमाच्या पोस्टरवरील सईचा लूक मात्र चाहत्यांना खटकला अन् त्यांनी मराठी कलाकार नेहमी मोलकरणीच्या भूमिकाच का करतात असा सवाल सिनेमा न पाहताच विचारायला सुरुवात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने