प्रदर्शनाआधीच समांथाच्या ‘यशोदा’ चित्रपटाने रचला इतिहास; कमावले इतके कोटी

मुंबई : मायोसायटीस या आजारामुळे दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही चांगलीच चर्चेत आली. आपल्याला झालेल्या या आजाराबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने तिच्या चाहत्यांना बातमी दिली होती. कित्येकांनी यातून तिने लवकर बाहेर पडावं यासाठी प्रार्थना केली. या आजाराशी झुंज देत असूनही समांथाने तिच्या कामात व्यत्यय आणू दिला नाही. समांथाने तिच्या आगामी ‘यशोदा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदेखील केलं.आता तिच्या या आगामी ‘यशोदा’ने प्रदर्शनाआधीच एक वेगळाच विक्रम रचला आहे. समांथाच्या या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच चक्क ५५ कोटींचा गल्ला जमवला आहे. समांथाच्या कारकीर्दीतील हा प्रदर्शनाआधीच सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ट्रेड अभ्यासक रमेश बाला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.समांथाच्या ‘यशोदा’ चित्रपटाचे डिजिटल हक्क हे २४ कोटी तर सॅटेलाइट हक्क १३ कोटी रुपयांना विकले गेल्याची माहिती त्यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. याबरोबरच डबिंग आणि बाहेरील देशातील प्रदर्शनाचे हक्क मिळून या चित्रपटाला ६ कोटी मिळाले आहेत. शिवाय या चित्रपटाच्या भारतातील वितरणासाठी १२ कोटी रुपये मिळाले असल्याची चर्चा आहे. असा तब्बल ५५ कोटीचा नफा ‘यशोदा’ने प्रदर्शनाआधीच केला आहे.

‘यशोदा’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी समांथाने सुमा कनकला यांच्या कार्यक्रमामध्ये तिने हजेरी लावली होती. तिने सुमा यांच्याशी बोलताना “काही दिवस चांगले असतात, तर काही दिवस वाईट असतात. एखाद्या दिवशी मला काही करावसं वाटतं नाही. तर कधीकधी मला इथंवर येण्यासाठी घेतलेली मेहनत, कष्ट आठवतात. काहीही झालं तरी शेवटी आपण जिंकतो हे मला ठाऊक आहे. मी आता लढायला तयार आहे”, असे वक्तव्य केले. या कार्यक्रमात बोलताना तिला अश्रू अनावर झाले. ‘यशोदा’ हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाचही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर तिचे ‘शंकुतलम’ आणि ‘खुशी’ हे बिगबजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने