"साने गुरुजी ते भिडे गुरुजी महाराष्ट्राचा प्रवास"

मुंबई : कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. संभाजी भिडे हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेले होते. यावेळी साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी भिडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी भिडे यांना थांबवले असता भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून पुन्हा भिडे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यासंबधी खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करत भिडे यांच्यावर टीका केली आहे.भिडे यांच्या वक्तव्यावर आता राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठी लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांची एक कविता ट्विट करत भिडे यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. ट्विटमद्धे तू आणि मी या नावाची कविता दिली आहे. त्या कवितेच्या शेवटच्या ओळी "मी धोतरात, तू शालूत, होऊ परंपरेचे दास, साने गुरुजी ते भिडे गुरुजी, महाराष्ट्राचा प्रवास .....!!!!! अशा स्वरूपाच्या आहेत. हेरंब कुलकर्णी यांची अशा आशयाची कविता सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन पोस्ट केली आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांनी आपल्या भूमिकेचा तात्काळ खुलासा करावा असे सांगण्यात आले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला का? स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे, असे आयोगाने म्हटंले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने