सावरकरांच्या मुद्द्यावरुन मविआमध्ये फूट पडू शकते - संजय राऊत

मुंबई: राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय काढला आणि राज्यभरात गदारोळ माजला आहे. राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असं सूचक विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.



आज सकाळी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपण राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं सांगितलं. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "तक्रारी दाखल करणे आणि प्रसिद्धी मिळवणे असा राजकीय उद्योग आपल्या देशात चालू आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, "बेरोजगारी, महागाई असे मुद्दे भारत जोडो यात्रेत असताना अचानक राहुल गांधींनी सावरकरांचा विषय का काढला? सावरकर कधीच भाजपा आणि संघाचे आदर्श पुरुष नव्हते. त्यांचे आयडॉल्स वेगळेच होते. भाजपाचे सावरकर प्रेम नकली आणि ढोंगी आहे." राहुल गांधींच्या वक्तव्याशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सहमत नाही, असं मत व्यक्त केल्यावर या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने