मोरबी दुर्घटनेत पाण्यात उडी घेवून वाचवले जीव... भाजपकडून मिळालं तिकीट

गुजरात:  गुजरातमधल्या मोरबी येथे नुकतीच एक पूल दुर्घटना घडली. यामध्ये १३१ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवेळी तेथे हजर असलेले आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवणारे कांतीलाल यांना भाजपने तिकीट दिलेलं आहे.कांतीलाल अमृतिया असं त्यांचं नाव आहे. कांतलाल हे माजी आमदार आहेत. भाजपने यावेळी त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे. मोरबी दुर्घटनेवेळी त्यांनी ट्यूबद्वारे पाण्यात उडी घेतली. त्यावेळी त्यांनी काही लोकांचे प्राणदेखील वाचवले. सुरुवातीला भाजपच्या संभाव्य यादीमध्ये हे नाव नव्हतं. परंतु अमृतिया यांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांना उमेदवारी निश्चित झाल्याचं सांगितलं जातंय.भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने काल रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. या बैठीत शंभर नावांच्या यादीला मंजुरी देण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यातल्या ८९ जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत. ही यादी जाहीर होणार आहे.गुजरातमध्ये इतके उमेदवार आहेत

गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागा आहेत. येथे दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होतील. निवडणुकीचे निकाल ८ डिसेंबर येणार आहेत. गुजरातमध्ये एकूण ४.९० कोटी मतदार आहेत. यामध्ये २.५३ कोटी पुरुष तर २.३७ कोटी महिला आणि १ हजार ४१७ तृतीयपंथी मतदार आहेत. गुजरातमध्ये ३.२४ लाख नवीन मतदार आहेत. मतदानासाठी ५१ हजार ७८२ बूथ असणार आहेत. यासह १८२ मॉडल पोलिंग स्टेशन असतील. ५० टक्के मतदार केंद्रांवरुन लाईव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहेत तर ३३ बूथवर युवा पोलिंग टीम असणार आहे.दरम्यान, कांतिलाल अमृतिया यांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांना तिकीट मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने