किरण माने घरातून बाहेर पडताच विकास सावंत बदलला? अपूर्वा नेमळेकरशी मैत्री अन्…; प्रेक्षकही संतापले

मुंबई: कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये एक ट्विस्ट आला आहे. गेल्या आठवड्याअखेर झालेलं एलिमिनेशन पाहता सगळ्यांनाच याचा धक्का बसला. ४९ दिवसांनंतर यशश्री मसुरकर घराबाहेर पडली. तर किरण मानेही घराबाहेर जातील असं सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी सांगितलं. किरण यांचं एलिमिनेशन म्हणजे घरातील स्पर्धकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. पण किरण यांच्याबाबतीत काही वेगळंच घडलं.किरण यांना आता सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आलं आहे. सीक्रेट रूममध्ये राहून घरातील सदस्य काय बोलत आहेत? हे किरण यांना पाहता येणार आहे. त्यांना हा विशेष अधिकार ‘बिग बॉस’ने दिला आहे. कलर्स मराठी वाहिनीने याबाबतचाच एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये किरण नाराज झालेले दिसत आहेत. किरण घराबाहेर पडताच त्यांचा जिवलग मित्र स्पर्धक विकास सावंत याने त्याची खेळी बदलेली दिसत आहे. हे पाहून किरण यांना वाईट वाटतं. विकास अपूर्वाला म्हणतो, “अपूर्वा खूप चांगली आहे.” यावर अपूर्वा म्हणते, “तुझ्याविषयी मला नेहमीच आपुलकी वाटते. तूच माझ्याबाबत अनेक गैरसमज करून घेतले आहेस.”हे पाहून किरण म्हणतात, “खूप वाईट वाटतं हो. याला इथपर्यंत आपण बरोबर घेऊन आलो आहेत.” पुढे विकास म्हणतो, “आता माझी काळजी घ्यायला अजून एक माणूस आहे.” विकासचं वागण पाहून “ही तर सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी है.” असं किरण माने म्हणतात. इतकंच नव्हे तर विकास व अपूर्वा एकमेकांना घास भरवत आहेत. पण विकासचं बदलतं वागणं पाहून प्रेक्षकही संतापले आहेत. अपूर्वा किरण माने अजूनही घराबाहेर गेले नाहीत, विकास सावंत मोठा गेमर आहे अशा अनेक कमेंट प्रेक्षकांनी हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने