कपील शर्माचा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोवरवर आली रस्त्यावर शेंगदाणे विकण्याची वेळ?

मुंबई : कॉमेडियन सुनील सिंग ग्रोव्हर हा आपल्या मजेदार आणि विनोदी स्वभावामूळे लोकप्रिय आहे. तो नेहमीच सर्वांच मनोरजंन करतो. त्याच्या कपील शर्माच्या शोमधील दादी तर कधी डॉक्टरचा रोल सर्वांनाच खळखळून हसवतो. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला शेंगदाणे भाजताना दिसत आहे. त्यामूळे त्याच्यांवर इतकी वाइट परिस्थीती खरंच आली आहे का? यामागचं सत्य तुम्हाला हे तुम्हाला कळायंला हवं.आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनील ग्रोव्हरने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून त्याचे चाहते नाराज झाले आहेत. एवढ्या मोठ्या विनोदवीराला शेंगदाणे विकावे लागले असे काय झाले, असा एकच प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत सुनीलने 'खाओ खाओ खाओ' असं लिहिलंय आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.खरं तर सुनीलने काही रस्त्याच्याकडेला शेंगदाणे विकत बसलेला नाही तर तो फिरत असतांना त्याला हे दुकान दिसलंय. त्याच्या दिलखुलास स्वभावामूळे त्याने इथही या लोकांचही आणि व्हिडिओ शेअर करुन त्याच्या चाहत्यांचही मनोरंजन केलंय

मात्र त्याच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्याच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहे. चाहते त्याच्या व्हिडिओंवर कमेंट करत आहेत तसेच विविध प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘कल्पना करा की तुम्ही शेंगदाणे विकत घ्यायला गेला अन् तुम्हाला तिथं सुनील भेटेले’. तर एकानं म्हटंलय 'सर, पत्ता द्या, आताच येतो.' दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले, 'कसे दिवस आले '. एका युजरने कॉमेडीयनची खिल्ली उडवत ‘द कपिल शर्मा शो सोडल्यानंतर ही वेळ आली’ अशी कमेंट केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने