निया शर्माचा खेळ संपला! पोस्ट चर्चेत...

मुंबई : लोकप्रिय सेलिब्रिटी डान्स रिअलिटी शो 'झलक दिखला जा 10' आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. शो जिंकण्यासाठी सर्वच स्पर्धक अतोनात मेहनत घेत आहेत. स्टंट करण्‍यापासून ते जॉड्रॉपिंग डान्‍स मूव्‍हपर्यंत, शक्य तितकं स्पर्धक आपल्‍या परफॉर्मन्सने प्रेक्षकांच आणि परिक्षकांचं मन जिंकण्याचं प्रयत्न करत आहे. मात्र या शोमध्येही मोठा ट्विस्ट आला आहे. टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा आणि नीति टेलर झलक दिखलाजा सीझन 10 च्या सेमीफायनलमध्ये बाहेर पडल्या आहेतझलक दिखला जा च्या उपांत्य फेरीतून निया आणि निती टेलर या दोघं तगड्या स्पर्धकांना बाहेर काढल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. नियाला प्रेक्षक या शोचे विजेते म्हणून पाहत असतांना त्यांची मोठी निराशा झाली आहे. खरं तर शो मध्ये एक मोठा ट्विस्ट दिसला ज्यात निशांत भट्ट आणि फैजू यांना समान मतं मिळाली होती. अशा परिस्थितीत शोच्या नियमांच्या आधारावर,परिक्षकांच्या निर्णयावरुन नीती टेलरला बाहेर जावे लागले.परिक्षकांच्या या निर्णयानंतर नीतीच्या हकालपट्टीने प्रेक्षक आश्चर्यचकित झाले असतांनाच नियालाही बेदखल करण्यात आल्याने धक्का बसला होता. दोघांचीही सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे आणि त्या दोन्ही शोच्या उत्तम स्पर्धकांपैकी एक होत्या. या एलिमिनेशनमुळे करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही यांनाही दुख: झालं आहे.बाहेर निघतांना नीती म्हणाली की, नियाला या शोची विजेती म्हणून पाहिलं जात होतं. मला याची अपेक्षा नव्हती, पण मी या शोमधील माझ्या प्रवासाने खूप आनंदी आहे. खूप एन्जॉय केले. माझ्या नृत्यांत बरीच सुधारणा झाली आहे. यासोबतच तिने तिच्या डान्सिंग पार्टनर आणि कोरिओग्राफर आकाश थापा याचंही आभार मानले.तर दुसरीकडे, एलिमिनेशननंतर, नियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर तिच्या चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीने लिहिले की, 'ती शोमधील तिच्या प्रवासावर खूश आहे. तिने चाहत्यांना 'अनावश्यक ट्रेंड' सुरू करू नका किंवा या शोला ' ‘बायस्ड'  ' म्हणू नका, असे आवाहन केले. त्यासोबत तिने एक इमोशल पोस्ट शेअर करत शोचे आभार मानले आणि तिच्या शोच्या प्रवासाचं वर्णन केलयं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने