‘आई कुठे काय करते’मध्ये अप्पांचा अपघात होणार? नव्या वळणामुळे मालिका चर्चेत

मुंबई - ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटतं. अरुंधतीप्रमाणेच मालिकेतील इतर पात्रांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. गौरी आणि यश यांच्यात अमेरिकेला जाण्यावरुन दुमत असताना आता यशच्या अत्यंत जवळची व्यक्ती संकटात सापडणार आहे.‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेतील अप्पा हे पात्र किशोर महाबोले साकारत आहेत. गौरी अमेरिकेला जाण्यावरुन यश आधीच नाखूश असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आता यशच्या अत्यंत जवळचे असणारे अप्पाही संकटात सापडणार आहेत. मालिकेतील एक प्रोमो व्हिडीओ स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

मालिकेतील या व्हिडीओमध्ये कांचन आजीचा भाऊ आणि अप्पा बाहेर गेलेले असतात. अप्पांच्या स्मृतीभंशाच्या आजारामुळे त्यांना फारसं काही आठवत नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. पाने घेऊन येतो असं सांगून अप्पा घराबाहेर पडतात ते बराच वेळ होऊनही घरी परततच नाहीत. कांचन आजीचे भाऊ ही गोष्ट घरातल्यांना सांगतात, तेव्हा सगळ्यांना अप्पांची चिंता वाटू लागते. अप्पा रस्त्यावरुन चालत असताना अचानक समोरुन गाडी आल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर आशितोष यशला “मृतदेहाजवळ अप्पांचं पाकीट मिळालं आहे. याशिवाय मृतदेहाचं वर्णनही अप्पांशी मिळत जुळत आहे”, असं म्हणत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने