श्रेया बुगडेने ‘कुछ कुछ होता हैं’ मधला फोटो शेअर करत शाहरुखला दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाली…

मुंबई : चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाद्वारे अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात पोहचली आहे. तिच्या अभिनयाने, विनोदी कामामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. श्रेया सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. नुकतीच तिने किंग खान अर्थात शाहरुख खानसाठी एक पोस्ट लिहली आहे. शाहरुख खान वाढदिवसानिमित्त तिने ही पोस्ट शेअर केली आहे.‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात आजवर मराठी कलाकार आले आहेत मात्र या कार्यक्रमाची लोकप्रियता बघता हिंदीतले बडे कलाकारदेखील या कार्यक्रमात येऊन गेले आहेत. बॉलिवूडचे तिन्ही खान या कार्यक्रमात उपस्थित राहिले आहेत. शाहरुख खान त्याच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता तेव्हा श्रेयाने त्याच्याबरोबर फोटो काढले होते. आज शाहरुख खानच्या वाढदिवशी देण्यासाठी तिने पुन्हा पोस्ट केलेत. यात तिने ‘कुछ कुछ होता हैं’ चित्रपटातल्या एका फोटोशी आपल्या फोटोची तुलना केली. नेटकऱ्यांनी या फोटोला पसंती दर्शवली आहे. haapy birthday king असा कॅप्शन तिने दिला आहे

श्रेयाने आपल्या करियरची बालनाट्यापासून केली आहे. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना एकांकिका, त्यानंतर हिडन मराठी मालिकेत भूमिका, फु बाई फु या कार्यक्रमात तिने आपली विनोदाची बाजूदेखील दाखवली. त्यानंतर गेली ८,९ वर्ष ती चला हवा येऊ द्या कार्यक्रमात भाऊ कदम, कुशल, निलेश साबळे यांच्या तोडीस तोड विनोद दिसून येत आहे.दरम्यान शाहरुख खानचे चाहते आपल्या लाडक्या स्टारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या ‘मन्नत’ बंगल्या बाहेर चाहत्यांनी तुडुंब गर्दी असून होतीकाल रात्री चाहत्यांनी शाहरुखासाठी फुलं, भेटवस्तू आणल्या होत्या. तर काहीजण शाहरुखचे पोस्टर घेऊन तिथे पोहोचले होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने