एलन मस्क यांच्यावर शेअर्स विकण्याची आली वेळ

अमेरिका : ट्विटर डिलनंतर एलन मस्क यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. ट्विटर डिलनंतर मस्क यांना दुसरा दणका बसला आहे. त्यांना त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे 3.95 अब्ज डॉलरचे शेअर्स विकण्याची वेळ आली आहे. मस्क यांनी नुकतेच ट्विटरशी करार केल्यानंतर अचानक शेअर्स विकले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांनाा उधाण आलं आहे.एलन मस्क यांनी सोशल मीडियातील दिग्गज ट्विटरला 44 अब्ज डॉलरमध्ये विकत घेतल्यानंतर त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे 3.95 अब्ज डॉलरचे शेअर्स विकण्याची वेळ आली आहे. मस्क यांनी टेस्लाचे एकूण 19.5 दशलक्ष शेअर्स विकले, ज्याची एकूण किंमत साधारण 3.95 अब्ज डॉलर्स आहे, असं अमेरिकन एक्सचेंज फायलिंगने म्हटले आहे.

मस्क यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी एप्रिलमध्ये 8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आणि ऑगस्टमध्ये 7 अब्ज डॉलर्सचे शेअर्स त्यांनी विकले आहेत. ट्विटर सध्या अमेरिकेच्या शेअर्ससाठी लिस्टेड आहे आणि मस्क यांचा ट्विटरला खासगी कंपनी करण्याचा मानस आहे. ट्विटर विकत घेण्याआधी त्यांनी तसे संकेतही दिले होते. गेल्या अनेक दिवसांत ट्विटरमध्ये मोठे बदल घडत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने