हिंदीच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय, मराठमोळ्या शिव ठाकरेचा बोलबाला..

मुंबई : आपला माणूस "शिव ठाकरे" सध्या बिग बॉस 16 मध्ये खुप जबरदस्त खेळतो आहे. आणि ज्या पद्धतीने शिव बिग बॉस च्या घरात सध्या वावरत आहे, प्रेक्षकांनी सुद्धा शिव ला आपली पसंती दर्शवली आहे. तऱ्हे तऱ्हे च्या लोकांनी गजबजलेल्या या घरात, शिव आपली वेगळी आणि चांगली ओळख निर्माण करतो आहे तर घरा बाहेर शिव च्या चाहत्यांनी त्याच्यासाठी चंग बांधला आहे.


शिव प्रत्येकवेळी बोलतो की "मी आज जे काही आहे ते माझ्या फॅन्स मुळे, ते ज्या पद्धतीने मला जीव लावतात, ते फक्त फॅन्स नसून माझी फॅमिली आहेत" आणि याचा प्रत्यय आज प्रत्येकाला आला. सामन्यातून वर आलेल्या आपल्या माणसासाठी, त्याच्या समर्थकांनी ट्विटर ला हादरवून सोडले आणि बिग बॉस 16 मधील शिव ठाकरे हा पहिला स्पर्धक ठरला ज्याच्या साठी 10 लाखापेक्षा जास्त ट्विट मागील 24 तासात झाले. त्याच्या सर्व चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर 'शेरदिल शिव ठाकरे' ट्रेंड केला ज्याने प्रियांका चहर चौधरी आणि इतर सर्व स्पर्धकांचा रेकॉर्ड तोडून, इन्स्टाग्रामवर 1 मिलियनचा आकडा पार केला.

यात शंका नाही की, शिव हा एकमेव स्पर्धक आहे ज्याला प्रेक्षकांकडून आणि स्वतः सलमान खानकडून अनेक प्रशंसा मिळाली आहेत. काही दिवसांपूर्वी, त्याचा जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता ज्यामध्ये सलमान बिग बॉस मराठीमध्ये त्याच्या खेळाबद्दल शिवचे कौतुक करताना दिसला होता. स्टेजवरील त्याच्या परिचयादरम्यानही, सलमानने त्याची ओळख अशी व्यक्ती म्हणून करून दिली जी नेहमी 'विजय' म्हणून ओळखली जाते. हा मोठा टप्पा गाठल्याबद्दल त्याच्या सर्व चाहत्यांचे आणि 'मराठी माणूस' म्हणून शिव ठाकरेचे अभिनंदन.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने