शिव ठाकरे-वीणा जगतापचे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘ते’ फोटो व्हायरल, नेटकरी म्हणतात “गौतम-सौंदर्याची खिल्ली उडवणारा…”

मुंबई :  बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील सौंदर्या शर्मा व गौतम विजचा इंटिमेट होतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सौंदर्या व गौतमच्या या कृतीवर घरातील काही सदस्यांनीही आक्षेप घेतला होता. शिव ठाकरे, एमसी स्टॅन व टीना दत्ता त्यांच्या या कृत्याबद्दल ‘बिग बॉस’च्या घरात टीका करतना दिसले.“शी…हे लोक काय करत आहेत”, असं शिव म्हणाला होता. एमसी स्टॅननेही त्याच्या या वक्तव्यावर सहमती दर्शविली होती. तर टीना दत्ताही “या लोकांना करताना लाज वाटत नाही. पण आम्ही बोलल्यावर मग वाईट वाटतं”, असं म्हणाली होती.शिवने सौंदर्या व गौतमबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांकडून त्याला ट्रोल केलं जात आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील शिव व वीणा जगतापचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.‘बिग बॉस हिंदी’मध्ये येण्यापूर्वी शिव ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. ‘बिग बॉस’च्या घरात शिवचे वीणा जगतापसह प्रेमसंबंध जुळले होते. शिव-वीणाची जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही अनेक वेळ शिव व वीणा रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, नंतर त्यांच्यात ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतरही अनेकदा शिव-वीणा यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगल्या होत्या. 

आताही शिव-वीणाचे ‘बिग बॉस’च्या घरातील फोटो व्हायरल होत आहेत.शिव-वीणाचे ‘बिग बॉस’च्या घरातील फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी शिवला ट्रोल केलं आहे. “गौतम-सौंदर्याबद्दल कोण बोलतंय बघा. ‘बिग बॉस मराठी’मध्ये काय घडलं होतं, याची आठवण करुन देते”, असं म्हटलं आहे.दुसऱ्याने “गौतम-सौंदर्याची खिल्ली उडवणारा हा तोच मुलगा आहे”, असं म्हटलं आहे. ‘बिग बॉस हिंदी’च्या घरात पहिल्या दिवसापासूनच शिवने त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली होती. प्रेक्षकांच्या तो पसंतीसही उतरत होता. परंतु, आता मात्र गौतम-सौंदर्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने