भरचौकात फाशी द्या; संजय राऊतांची मागणी

मुंबई: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या ह्त्येमध्ये आरोपी आफताबच्या निर्दयीपणाचीदेखील खूप चर्चा केली जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर अवघा देश हादरून गेला आहे. तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोपीवर खटला न चालवता थेट फाशी द्या अशी मागणी केली आहे.दिल्लीत २६ वर्षिय श्रध्दाच्या २८ वर्षिय बॉयफ्रेंड आफताबने केलेल्या निर्घूण हत्येने संपूर्ण देशाला हादरवलं आहे. दिल्लीतील श्रद्धाच्या खळबळजनक हत्येबाबत मंगळवारी मुंबईत निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाचे नेतृत्व भाजप नेते राम कदम यांनी केले. त्यांनी हे प्रकरण 'लव्ह जिहाद' असल्याचे त्यांचे म्हणने आहे.दरम्यान संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्लीत झालेल्या हत्येवर भाष्य केलं. 'वसईतील श्रद्धाची दिल्लीत झालेली हत्या धक्कादायक आहे. कुटुंबीयांचा आक्रोश समजून घ्यावा. ही विकृती आहे. विकृतीच्या पुढची गोष्ट आहे. त्यामुळे आरोपीवर खटला न चालवता भरचौकात फाशी द्या'. अशी मागणी राऊत यांनी यावेळी केली.

आफताब अमीन पूनावाला असं या घटनेतील आरोपी असणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्यानं श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला आणि त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. फ्रिजमध्ये हे शरीराचे तुकडे ठेवून दिल्लीतील वेगवेगळ्या भागात ते फेकून त्याची विल्हेवाट लावण्याचा कट त्यानं रचला होता. हत्याकांड झाल्यानंतर सहा महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला ताब्यात घेतलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने