शिव ठाकरेची बहिण मनिषा ठाकरे अचानक चर्चेत, बिग बॉसवर भडकत म्हणालीय,'नेहमीच काय...'

मुंबई : गेल्या काही दिवसात बिग बॉस (हिंदी) च्या घरात खूप काही गोष्टी घडल्या आहेत. सुरुवातीला अर्चना गौतम आणि शिव ठाकरेचं भांडण आणि आता एमसी स्टॅन तसंच शालिन भनोटचं भांडण. सगळ्या भांडणात कॉमन होती प्रियंका चाहर चौधरी.सुरुवातीला तिनं अर्चनाला साथ दिली होती आणि आता शालीन भनोटच्या बाजूनं बोलताना दिसतेय. यासाठी तिला खूप सुनावलं देखील गेलं. इतकंच नाही तर बिग बॉसनं देखील फटकारलं होतं. आता मराठी बिग बॉस २ विनर शिव ठाकरेची बहिण मनीषा ठाकरेनं मीडियाशी बातचीत करताना प्रियंकाला ती इनसिक्योर असल्याचं म्हटलं आहे
त्याचं झालं असं की, जेव्हा अर्चना गौतम आणि शिव ठाकरेचं भांडण झालं होतं तेव्हा सलमान खानने शिवची शाळा घेतली होती. तो म्हणाला होतो, शिवने पूर्ण प्लॅनिंग करुन अर्चनाला छेडलं होतं. अन् घराच्या बाहेर जाण्यास प्रवृत्त केलं होतं. त्यानंतर पुन्हा अर्चनाला बिग बॉसच्या घरात आणलं गेलं होतं.आता शिव ठाकरेच्या बहिणीनं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे,''ज्या पद्धतीन शिवचा मुद्दा उगाचच मोठा केला गेला,त्याने आम्ही थोडे दुःखी झालो आहोत. पूर्ण गेम एकमेकांना भडकवण्याचा आहे. सलमान खानचं म्हणणं आहे बिग बॉसच्या घरात उगाच बाहेरच्या मुद्द्यांना घेऊन बोललं नाही पाहिजे. आणि यानंतर शीवने देखील आपली चूक मान्य केली होती.''

''शालिन आणि शीव मध्ये खोलीच्या आत जे बोलणं झालं,त्यात शालीनं माझ्या भावाला म्हणाला केवळ शीव अर्चनाला चूप करू शकतो,कारण त्याला तिची नस कळाली आहे. शिवनं तिला मजेमजेत छेडलं होतं ना की कुठल्या चुकीच्या हेतूने''.शीवची बहिण मनिषा पुढे म्हणाली,''भांडणा दरम्यान बोललं गेलं की शिवने अर्चनाचा हातही पकडला. क्लीप पाहिल्यावर कळत आहे की तो आपला हात सोडवायचा प्रयत्न करत आहे. त्याने धक्काही दिला नाही,यावर कोणाचं काहीच म्हणणं नाही. ते का दुर्लक्षित केलं जात आहे?''मनीषाचं म्हणणं आहे की, ''मला या गोष्टीवर विश्वास आहे की ज्यापद्धतीनं अर्चनाला शारिरीक हिंसेनंतर पुन्हा घरात घेतलं गेलं तशी संधी शिवला किंवा इतर कोणाला मिळेल का किंवा मिळाली असती का? ती चांगली खेळतेय, शो ला कंटेट देतेय म्हणून सारं केलं,आम्हाला याचा काहीच प्रॉब्लेम नाही की तिनं पुन्हा घरात एन्ट्री केलीय''.''जेव्हा ती जाताना बिग बॉसला आणि शिवला घरात राहू देण्याची विनंती करत होती तेव्हा तर शिवनं तिला जवळपास माफ करून टाकलं होतं. त्याला माहित होतं घरातील सगळे आपल्या बाजूने आहेत पण अर्चनाची तो गॅरंटी देऊ शकत नव्हता. मला माहितीय अर्चनाने जाणून-बुजून असं केलं नसेल,पण शिववर उगाचच तिला बेघर केल्याचा ठप्पा पाडला गेला''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने