मांजरेकर आज सगळ्यांची अक्कड उतरवणार..

मुंबई -  बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता चार आठवडे झाले आहेत. या आठवड्यात स्पर्धकांनी चांगलाच राडा घातला. या सर्वांचा हिशोब आज चुकता होणार आहे. कारण स्पर्धकांनी कितीही राडा घातला तरी प्रेक्षक वाट पाहत असतात ते बिग बॉसच्या चावडीची. महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. आज बिग बॉस च्या घरात चावडी रंगणार आहे,ही चावडी काही विशेष असणार आहे..


बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील हा सर्वात थरारक आठवडा होता. या आठवड्यात स्पर्धकांनी अक्षरशः राडा घातला. मग ते 'खुल्ला कर राडा' या टास्कमध्ये स्पर्धकांनी धुमाकूळ घातला. ही कार्य बिग बॉसच्या घरातील सर्वात मोठे कार्य होते. शिवाय कॅप्टनसी टास्कही विशेष रंगला. यामध्ये त्रिशूल आणि प्रसादच्या धक्काबुक्कीत घराची काच फुटली. त्यामुळे या सगळ्या राड्यांचा आज हिशोब होणार आहे. आज मांजरेकर सर्वांची अक्कड उतरवणार आहे. त्याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे'या आठवड्यात सगळे बालपणाच्या खेळात रमले. काहींनी सी-सॉ वरची पकड सोडली नाही, तर काहींनी स्वभावातली अक्कड.. त्यामुळे आज यांची अक्कड मोडूया.. चावडीवर भेटूया..' असे मांजरेकर या प्रोमोत म्हणतात. हा प्रोमो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून, आज मांजरेकर कुणाची तासणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने