कोण चूक? कोण बरोबर? आज मांजरेकर घेणार या आठवड्याचा हिशोब..

मुंबई : बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता जवळपास पन्नास दिवसांचा टप्पा पूर्ण होत आला आहे. आजवर बिग बॉसच्या घराने आपले खूप मनोरंजन केले. या पन्नास दिवसात आपण राडा, प्रेम, दंगा, तोडफोड सगळंच पाहिलं. स्पर्धक जातानाचे भावनिक क्षण अनुभवले तर कधी एकमेकांना घराबाहेर काढण्याची चढाओढ. आठवड्याभरात कितीही राडा घातला तरी सर्वांना उत्सुकता असते ती 'चावडी'ची.. म्हणजेच शनिवारी महेश मांजरेकर स्पर्धकांची कशी शाळा लावतायत ही पाहायची..सध्या घरातले वातावरण अत्यंत चढाओढीचे झाले आहे. प्रत्येकजण जिंकण्यासाठी झगडत आहे. या आठवड्यात 'सोसल तेवढचं सोशल' या टास्क ने खरी रंगत आणली. या कार्यात स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. एकमेकांची डोकी भादरण्यापासून ते मिरची, कच्चे अंडे खाऊ घालण्या पर्यंत सगळं काही केलं. या टास्कमध्ये स्पर्धक एकमेकांच्या विरोधात वेड्यासारखे लढले. एवढे करूनही यंदा घरात कुणीही कॅप्टन झालं नाही. ज्या पदासाठी एवढी मरामर केली तेच पद हातून निसटले. अक्षय केळकरच्या निर्णयामुळे कुणीही कॅप्टन होऊ शकले नाही. त्यामुळे त्यानंतर खरे राजकारण सुरू झाले.

त्यामुळे यंदा चुगली, राडे, वाद यांचेही प्रमाण वाढलेले दिसले. कुठे वेगळे झालेले विकास आणि किरण माने एकत्र आले तर कुठे कायम एकत्र असणाऱ्या तेजस्विनी आणि अमृता धोंगडे प्रसादमुळे वेगळ्या झाल्या. त्यामुळे या आठवड्यात केलेल्या सर्व राड्यांचा हिशोब करायला आज मांजरेकर बिग बॉसच्या चावडीवर येणार आहे.नुकताच याचा प्रोमो आऊट झाला.. ज्यामध्ये मांजरेकर म्हणतात, 'मित्रांनो या आठवड्यात घरातील स्पर्धक भलतेच व्हायरल झाले. कुणी आऊटऑफ कंट्रोल जाऊन कमेंट केल्या तर कुणी खरी इमेज दाखवली. आठवडाभर धिंगाणा घातलेल्या सर्वांनाच दाखवूया आता आपला हिसका.. बिग बॉसच्या चावडीवर..' हा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने