रखू छुपा के सबसे ओ लैला...'पारंपरिक' स्मृती पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल!

मुंबईः  भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच इंग्लंडमध्ये मालिका विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय महिला संघाने 23 वर्षानंतर इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकली होती. त्यानंतर महिला संघाने आशिया कप जिंकत आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला. आशिया कप फायनलमध्ये भारताची डावखुरी शैलीदार फलंदाज स्मृती मानधनाने नाबाद अर्धशतकी खेळी करत मोलाचे योगदान दिले होते. ही स्मृती मानधना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता ती तिच्या शैलीदार खेळीमुळे चर्चेत आलेली नसून ती तिच्या पारंपरिक पोशाखामुळे चर्चेत आली आहे.
स्मृती मानधना सोशल मीडियावर चांगलीच अक्टिव्ह असते. ती तिचे अनेक मॉर्डन लूकमधील फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करते. मात्र स्मृतीने नुकतेच आपले पारंपरिक पोशाखातील फोटो इन्स्टाग्रावर शेअर करत एकच खळबळ उडवून दिली आहे. स्मृतीला पारंपरिक पोशाखात पाहून नेटकऱ्यांने कमेंट बॉक्समध्ये कमेंटचा पाऊस पाडला आहे.एका नेटकऱ्याने तर स्मृतीच्या व्हिडिओवर 'एक तर ह्रदय आहे कितीवेळा जिंकशील' अशी कमेंट केली आहे. या कमेंटवर रिप्लाय देखील भरपूर आले आहेत. मात्र त्यातील 'भावा जरा दमानं कोणी ऐकेल मग जिंकणं सोड ह्रदय काढून टाकावं लागेल.' ही कमेंट सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.स्मृती मानधनाने कौटुंबीक कार्यक्रमातील आपले पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर केले. स्मृतीने चमी अँड पलक या डिझायनर ब्रँडचा गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यात सुंदर स्मृतीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने