राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणणार; नीतेश राणे

कोल्हापूर : ‘‘काही तरुण तरुणींना फूस लावून पळवून नेतात. त्यांच्याशी लग्न करतात आणि नंतर त्या तरुणींचे धर्मांतर केले जाते. हे प्रकार राज्यात वाढत आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी आता हिवाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा करण्याचा विचार सुरू असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले, ‘तरुणींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार वाढत आहेत. यासाठी या तरुणांना पैसे, गाड्या पुरवणारी एक यंत्रणा कार्यरत आहे. हे एक षड्‍यंत्र आहे. असे प्रकार पुढे आले की, कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी असतात.उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा करण्याचा आमचा विचार सुरू आहे.

‘‘नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात देशातील सर्वांत चांगला धर्मांतरविरोधी कायदा आम्ही करणार आहोत. कोल्हापुरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन १५ दिवस उलटले तरी पोलिसांना ती मुलगी आणि मुलगा सापडले नाहीत. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार,’’ असे राणे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने