“याच साठी केला होता अट्टहास…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सध्या सुबोध भावे त्याच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. नुकतंच सुबोध भावेचा वाढदिवस पार पडला. या वाढदिवसानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. सुबोधने काल (९ नोव्हेंबर) त्याचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याचा एक कोलाज फोटोही शेअर केला आहे.दरम्यान सुबोध भावेच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. यावर अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सुबोध भावे हा त्याच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. सध्या या चित्रपटावरुन चांगलाच वाद रंगला आहे. या चित्रपटातून इतिहासाची तोडमोड करुन दाखवण्यात आल्याचे बोललं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने