मंत्रालयामध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; काय आहे कारण?

मुंबईः आज मंत्रालयामध्ये एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात असलेल्या जाळीवर उडी घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. जाळीमुळे त्याचा जीव वाचला आहे.हा तरुण बऱ्याच वेळ जाळीवर पडून होता. तिथेच तो आपल्या मागण्या काय आहेत, ते सांगत होता. त्यानंतर त्याला खाली उतरवलं. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. बघ्यांची गर्दी मंत्रालयाच्या आतील परिसरामध्ये जमली होती.हा शेतकरी असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने हे पाऊल उचलल्याचं या व्यक्तीने सांगितलं. या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने