अशी झाली देशात टी. व्ही.ची एंट्री, जाणून घ्या प्रवास

मुंबई: आता बाजारात 4k, HD, LCD, LED असे नानाप्रकारचे टिव्ही आल्याने आत्ताच्या पोरांना त्यांच विशेष कौतुक वाटत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने तर ही उत्सुकता शुन्यच झालीये. पण 1970-80 दरम्यान पुर्ण गल्लीत एक टिव्हिचा काळा डब्बा असला तरी भारी काहीतरी वाटायचं.खाटेवर बसलेले बाबा जे सांगतील तेच चॅनल सर्वांना बघाव लागणार. कधी रामायण कधी महाभारत तर कधी अमिताभचा एखादा जुना मुव्ही...फक्त चित्र हलताना दिसल तरी भारी वाटायच. आज आंतरराष्ट्रीय टेलीव्हीजन दिना निमीत्त भारतात टिव्ही कसा नी कधी आला ते बघू.भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 1959 ला राजधानी दिल्लीत टेलिव्हिजन सेंटरच उद्घाटन झाल. नेहरूंच राजकारण समाजवादाच्या मार्गाच असल्याने दूरदर्शन ही चैनीची गोष्ट वाटायची. त्यामुळे त्याचा विकास खूप हळू झाला. दिल्ली शहर आणि आजूबाजूच्या भागात आठवड्यातील मर्यादित काळापुरतं ब्लॅक अँड व्हाईट प्रक्षेपण सुरू करण्यात आल.



स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात दूरदर्शनसाठी लागणार तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं. त्यामुळे पन्नासच्या दशकात दूरदर्शनचा शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी काही उपयोग होईल का? या अंगाने चाचणी सुरू झाली. या योजनेसाठी युनीसेफने वीस हजार डॉलर्सच अनुदान दिलं. फिलिप्स इंडिया कंपनीने सवलतीच्या दरात ट्रान्सपोर्टर देण्याची तयारी दाखवली. काही उपकरणे उपलब्ध करून देण्यास अमेरिका राजी झाला. असा सर्व जुगाड करून 1959 मध्ये दिल्लीला दूरदर्शन केंद्र उभं राहिलं.दिल्लीच्या आजूबाजूच्या 40 किलोमीटरच्या पट्यात कार्यक्रम दिसू लागले. या कार्यक्रमांना किती प्रतिसाद मिळतो हे तपासण्यासाठी या भागात 180 सेंटर सुरु केले. आठवड्यातील तीन दिवस आणि दिवसाला अर्ध्या तास इतकाच वेळ कार्यक्रम दिसायचे. हे कार्यक्रम फक्त टेलीकेबलच Subscribtion घेतलेलेच बघू शकत होते. हा तेव्हाचा ओटीटी होता.या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने 1965 पासून मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. याच काळात दूरदर्शनवरील प्रसीध्द ठरलेल्या हिंदी चित्रपटातील गाण्यांचा चित्रहार कार्यक्रम सुरु झाला. दूरदर्शनच्या इतिहासात सर्वाधीक काळ चाललेला हा एकमेव कार्यक्रम आहे.

पुढे भारताने जर्मनीच्या मदतीने दूरदर्शनचा स्वतंत्र स्टुडिओ सुरू केला. दूरदर्शनवर शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी कृषिदर्शन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा कार्यक्रम दिल्लीच्या आसपास 80 गावांमध्ये शेतकऱ्यांना दिसत असे. सुरुवातीला दूरदर्शनची सुरुवात शैक्षणिक आणि सामाजिक हेतू पुढे करूनच झाली होती.देशाचं आकारमान पाहता त्या काळात फारच कमी लोकांपर्यंत दूरदर्शन पोहोचत होतं. 70 च्या दशकाच्या सुरवातीला देशात इतरत्र दूरदर्शन केंद्र उभे राहिल्यानंतर मात्र दूरदर्शन खरी वाटचाल सुरु झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने