शकीराचं वाका वाका ते आताच्या हय्या हय्यापर्यंत, 'ही' आहेत फिफाची फेमस थीम साँग्स

कतार: फिफा विश्वचषकात गोल, खेळाडू, मैदान आदींबाबत ज्याप्रमाणे क्रेझ असते. त्यापेक्षाही जास्त क्रेझ ही फिफाच्या थीम साँगची आहे. फुटबॉलच्या महासंग्रामातसोबतच थीम साँगलाही या स्पर्धेत विशेष स्थान आहे. या वर्षीचे फिफा विश्वचषकाचे थीम साँग "हय्या हय्या" त्रिनिदाद कार्डोना, डेव्हिडो आणि आयशा यांनी संगीतबद्ध केले आहे.FIFA चं थीम साँग हे फीफाचं अँथम साँग असतं. हे साँग नेहमी फुटबॉल चाहत्यांवर एक वेगळी छाप सोडत असतं. या वर्षीच्या फीफा विश्वचषकाचं हय्या हय्या हे थीम साँग त्रिनिदाद कार्डोना, डेव्हिडो आणि आयशा यांनी संगीतबद्ध केलेले आहे. खरं तर, हे थीम साँग अनेक गाण्यांचे कलेक्शन आहे. आज आम्ही फुटबॉल चाहत्यांना आतापर्यंतच्या सर्वात फीफाच्या थीम साँगवर नजर टाकणार आहोत.1990 पासून प्रत्येक विश्वचषकादरम्यान थीम साँग प्रसिद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यतच्या सर्वच थीम साँगने प्रत्येक चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान मिळवले आहे.टू बी नंबर वन

1990 साली इटलीमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकादरम्यान टू बी नंबर वन हे अँथम साँग होते. फीफाच्या इतिहासातील हे पहिले असे गाणे होते जे फीफाचे अँथम साँग म्हणून प्रसिद्ध झाले. हे एक स्लो रॉक साँग होते जे जॉर्जिओने गायले होते. हे साँग इंग्रजी आणि इटालियन भाषांमध्ये रिलीज करण्यात आले होते.

ग्लोरीलँड gloryland

1994 साली फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद अमेरिकेने भूषवले होते. या वेळी ग्लोरीलँड नावाचे डॅरिल हॉल आणि साउंड्स ऑफ ब्लॅकनेस यांनी एक थीम साँग बनवले होते. 90 च्या दशकातील क्लासिक अमेरिकन स्लो पॉप गाण्यांपासून प्रेरित असलेले हे त्यावेळचे हिट गाणे होते.

द कप ऑफ लाईफ

फ्रान्समध्ये पार पडलेल्या 1998 च्या विश्वचषकासाठी कप ऑफ लाइफ साँग रिलीज करण्यात आले होते. रिकी मार्टिनच्या या गाण्याने प्रत्येक फुटबॉल प्रेमिला वेडं करून सोडलं होते. आजही हे थीम साँग फीफाच्या सर्वात प्रसिद्ध साँग्सपैकी एक आहे.

बूम

2002 मध्ये दक्षिण कोरिया आणि जपानने संयुक्तपणे फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे बूम साँग थीम म्हणून रिलीज करण्यात आले होते. फिफाच्या सर्वात प्रमुख साँग्समध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. हे आयटम साँग अमेरिकन गायिका अनास्तासियाने गायले होते. तर, याचे बोल ग्लेन बॅलार्ड यांनी लिहिले होते.

द आयटम ऑफ अवर लाइव्स

2006 च्या फिफा विश्वचषकाचे यजमानपद जर्मनीकडे होते. त्यावेळी द आयटम ऑफ अवर लाइव्ह हे गाणे रिलीज करण्यात आले होते. टोनी ब्रॅक्सटन आणि बहुराष्ट्रीय ऑपेरा बँड II दिवो यांनी हे गाणे सादर केले होते.

वाका वाका

वाका वाका हे फिफा विश्वचषकातील सर्वात प्रसिद्ध थीम साँगपैकी एक आहे. हे गाणे कोलंबियन गायिका शकीराने गायले होते. वाका वाका हे गाणे 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या विश्वचषकाेवेळी प्रदर्शित करण्यात आले होते, इतक्या वर्षांनंतरही आजही हे गाणे फुटबॉल चाहत्यांच्या ओठावर आहे.

वी आर वन

2014 मध्ये ब्राझीलमध्ये विश्वचषक पार पडला होता. ज्यामध्ये पिटबुलने वी आर वन हे गाणे गायले होते. या थीम साँगमध्ये ब्राझीलच्या लोकसंगीताची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ते अनेकांच्या पसंतीस पडले होते.

लाइव्ह इट अप

2018 च्या FIFA विश्वचषकामध्ये Live It Up हे हाय टेम्पो थीम साँग सादर करण्यात आले होते. हे गाणे निकी जॅमने सादर केले होते. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ आणि अल्बेनियन गायिका एरा इस्त्रेफी यांनी हे गाणे सादर केले होते. यंदाचा म्हणजेच 2022 चा फिफा विश्वचषक कतारमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वर्षीच्या स्पर्धेचे थीम साँग त्रिनिदाद कार्डोना, डेव्हिडो आणि आयशा यांनी संगीतबद्ध केलेले आहे. हे साँगमध्ये पारंपरिक अरबी संगीताची झलक पाहायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने